Rajanikanth On Sarath Babu :"मी त्यांच्यासमोर कधीच सिगारेट ओढत नव्हतो !" या व्यक्तीची आठवण काढत रजनीकांत झाले भावूक...

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचे मित्र सरथ बाबू यांचे निधन झाले आहे.
Rajanikanth On Sarath Babu
Rajanikanth On Sarath Babu Dainik Gomantak

अभिनेते आणि सुपरस्टार रजनीकांत यांचे जवळचे मित्र सरथ बाबू यांचे सोमवारी हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात अनेक अवयव निकामी झाल्याने निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू 71 वर्षांचे होते. कमल हासन, सूर्या, कार्ती यांच्यासह तमिळ चित्रपट उद्योगातील अनेक सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

दिवंगत अभिनेत्याबद्दल बोलणाऱ्यांमध्ये रजनीकांत यांचाही समावेश होता. त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये सरथ बाबूंसोबत एकत्र काम केले होते. यावेळी रजनीकांत म्हणाले की, "मला त्यांना सरथ बाबूंबद्दल प्रचंड आदर आहे. सरथची इच्छा होती की मी धूम्रपान सोडावे आणि मी त्यांच्यासमोर धूम्रपान करू नये."

आधीची ओळख

रजनीकांत यांनी सांगितले की ते अभिनेता होण्यापूर्वी आणि मित्र बनण्यापूर्वी ते एकमेकांना ओळखत होते. ते पुढे म्हणाले की सरथ बाबूंच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचे आणि ते कधीही नाराज दिसायचे नाहीत. 

या महिन्याच्या सुरुवातीला सरथ बाबू यांना हैदराबादमधील एआयजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, त्यांना सेप्सिस झाला होता, ज्यामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

माझी सिगारेट हिसकावून बाहेर फेकायचा

आपल्या मित्राबद्दल बोलताना रजनीकांत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "मी त्याला कधीच गंभीर किंवा रागावलेले पाहिले नाही. तुम्हा सर्वांना माहित आहे की मी त्याच्यासोबत काम केलेले सर्व चित्रपट खूप हिट आहेत - मुल्लम मालारुम, मुथू, अन्नामलाई आणि वेलाईकरन .

त्याची माझ्यावर खूप प्रेम आणि आपुलकी होती...तो नेहमी माझ्या धूम्रपानाबद्दल बोलायचा आणि ते कायमचे सोडायला सांगायचा .त्याने मला सिगारेट ओढताना पाहिलं तर तो सिगारेट हिसकावून बाहेर टाकायचा. ."

सरथ बाबूशी रजनीकांत यांची मैत्री

तमिळ अभिनेत्याने 1992 मध्ये सुरेश क्रिस्ना दिग्दर्शित अन्नामलाई चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनसाठी कशी मदत केली होती? याचा किस्सा सांगताना रजनीकांत म्हणाले,

"अण्णामलाईमध्ये, एका आव्हानात्मक सीन आम्ही शूट करत होतो. मी खूप रिटेक घेतले कारण सीनमध्ये भावना व्यक्तच होत्या नव्हत्या. त्याने मला सिगारेट दिली आणि त्यानंतर मला आराम वाटला आणि टेक फायनल झाला. तो मला नेहमी तब्येत जपण्याचा सल्ला देत असे पण आता तो नाही."

सरथ बाबू यांचे करिअर

सरथ बाबूने 1973 मध्ये तेलुगू चित्रपट रामा राज्यवासमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ते या वर्षी वसंता मुल्लई या तामिळ चित्रपटात शेवटचा दिसले होते. सरथ बाबू यांच्यावर मंगळवारी चेन्नईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Rajanikanth On Sarath Babu
Rajinikanth Retirement : थलैवाचा इंडस्ट्रीला बाय बाय? रजनीकांतचा हा शेवटचा चित्रपट असल्याची चर्चा....

रजनीकांत यांच्या निवृत्तीची शक्यता

आता रजनीकांत यांच्याबद्दल बातमी समोर आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून लोकेश कनगराजसोबतचा चित्रपट हा रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असू शकतो. अशा चर्चांना उधाण आलं आहे.

जर असं झालं तर थलैवाच्या फॅन्सना या गोष्टीचा प्रचंड धक्का बसु शकतो. गेली 4 दशके देशभरातल्या प्रेक्षकांना आपल्या अभिनय आणि स्टाईलने वेड लावणाऱ्या थलैवाचे फॅन्स त्यांना देव मानतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com