Natu Natu: RRR टीमने 80 कोटी खर्च करून ऑस्कर विकत घेतला? राजामौलींचा मुलगा कार्तिकेय काय म्हणाला?

दिग्दर्शक S.S राजामौली यांच्या मुलाने केलेल्या एका विधानामुळे इंडस्ट्रीत एकच गोंधळ माजला आहे.
RRR Movie
RRR Movie Dainik Gomantak
Published on
Updated on

95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ऑस्कर पुरस्कार जिंकून भारताची नावलौकिक मिळविणाऱ्या 'RRR' या चित्रपटावर चाहत्यांना आनंद होत असतानाच अचानक हा पुरस्कार पैशाने विकत घेतल्याची बातमी आली.

गेल्या अनेक दिवसांपासून 'आरआरआर'साठी ऑस्कर अवॉर्ड्स विकत घेतल्याची चर्चा आहे. यासाठी टीमने 80 कोटी रुपये खर्चही केले होते अशी चर्चा झाली होती . यावेळी पुरस्कारासाठी पैसे खर्च करण्याचे खरे सत्य काय आहे, याचा खुलासा एसएस राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय याने केला आहे

प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कार्तिकेयने एका मुलाखतीत खुलासा केला की RRRच्या टीमने ऑस्कर जिंकण्यासाठी पैसे खर्च केले की नाही. 

त्यांने सांगितले की ऑस्कर मोहिमेसाठी टीमने पैसे खर्च केले आहेत, परंतु ही रक्कम जितकी मोठी वाटते तितकी नाही. टीमने पैसे कुठे आणि कसे खर्च केले याचा खुलासा त्यांनी केला.

जिथे वोटर्सना मोठ्या प्रमाणात बोलावले जाते, तिथे जास्त पैसे खर्च केले जातात. राम चरण , ज्युनियर एनटीआर, प्रेम रक्षित, काल भैरव, राहुल स्पिलीगुंज यांसारख्या लोकांना अधिकृत आमंत्रणे पाठवण्यात आली होती . मात्र तो सोबत इतर कोणाला घेऊन येत असेल तर त्यासाठी अकादमीला मेलद्वारे कळवावे लागेल. 

तसेच यासाठी वेगळे पैसे भरावे लागतील. 'आरआरआर' मधून गेलेल्या सर्व लोकांना पैसे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वात वरच्या सीटसाठी प्रति व्यक्ती 750 रुपये आणि खालच्या सीटसाठी 1500 रुपये देण्यात आले.

RRR Movie
Sara Ali Khan : सारा अली खानला सेटवर अनैसर्गिक शक्तींची चाहूल...वांकानेरच्या राजवाड्याचं रहस्य काय?

ते पुढे म्हणाले की, ऑस्कर विकत घेता येत नाही. त्यात लोकांचे प्रेम आहे, जे विकत घेता येत नाही. हा चित्रपट लोकांच्या नजरेत आणण्यासाठी त्याच्या प्रचारावर मोठा खर्च करावा लागतो.या वेळी तीन भारतीय चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. 

'RRR' व्यतिरिक्त, गुनीत मोंगाचा 'द एलिफंट व्हिस्पर्स' आणि शौनक सेनचा 'ऑल दॅट ब्रेथ्स' यांचाही समावेश होता. यातील दोन चित्रपटांना ऑस्कर मिळाले, त्यात 'आरआरआर'चा समावेश आहे. या चित्रपटाला 'नाटू-नाटू' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. भारतीय चित्रपटाला या श्रेणीत पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com