Raghav Chadha Parineeti Chopra Engagement: 'वे माही' गाणं वाजलं अन् राघव चढ्ढांनी परिणिताला केलं किस...Video Viral

इतक्या दिवसांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत शनिवारी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला.
Raghav Chadha Parineeti Chopra
Raghav Chadha Parineeti Chopra Dainik Gomantak

इतक्या दिवसांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत शनिवारी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला. या साखरपुड्यातील परिणीती आणि राघव यांचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

साखरपुड्यातील या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. दोघे आनंदात एकमेकांनासोबत सोहळ्यातील संगीताचा आस्वाद घेत होते. परिणीती राघव यांना मिठी मारून उभी होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. ते दोघे गाण्यामध्ये रंगले होते, परिणीती राघव यांना पाहून 'वे माही' गाणं गात होती तेवढ्यात राघव यांनी सर्वासमोर परिणीतीला किस केले. 

दोन महिन्यांपूर्वीच राघव - परिणिती एका ठिकाणी स्पॉट झाले होते तेव्हाच सोशल मिडीयावर या नात्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. पण दोघांच्या नात्याविषयी कुठलीच अधिकृत माहिती मिळत नव्हती.

परिणिती आणि राघव चड्ढा एकमेकांना कॉलेजपासून ओळखत असल्याची माहिती मिळतेय. दोघे परदेशातही एकत्र शिक्षण घेते होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते दोघं एकत्र होते आणि तेव्हापासून ते एकमेकांचे मित्र होते असे कळते आहे

Raghav Chadha Parineeti Chopra
Nora Fatehi Viral Video : हाय गर्मी! गोव्यात भर रस्त्यात नोराचा हॉट डान्स, ट्रॅफीक झालं जॅम; पाहा व्हिडीओ

राघव- परिणितीच्या नात्याची सुरूवात नेमकी कधी झाली? हे सांगता येत नसले तरी रेशमी बंध जुळण्याची सुरूवात परदेशातल्या त्यांच्या शिक्षणापासुन झाली असं म्हणता येईल.पण राघव चढ्ढा जेव्हा पंजाबच्या दौऱ्यावर होते तेव्हा परिणितीचं शूटही तिथेच सुरू होतं, याचवेळी दोघांनी एकमेकांना पसंत केलं अशीही चर्चा आहे.

दोघांनी यावर बोलणं पूर्णत: टाळलं होतं. गेले काही दिवस ही सगळी चर्चा सुरू असताना आता दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज संध्याकाळी साखरपुड्याचा हा सोहळा पार पडला आहे. अजुनतरी विवाह सोहळ्याची तारीख कळू शकली नसली तरी साखरपुडा पार पाडल्यानंतर नक्कीच परिणिती आणि राघव यांच्या बोहल्यावर चढण्याची तारीख दोघांच्या चाहत्यांना समजू शकेल.

या सोहळ्यात सिने जगतातील आणि राजकारणातील जवळपास 100 पाहुणे सहभागी झाले होते. लंडनहून परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्राही शनिवारी दिल्लीत पोहोचली. करण जोहर आणि मनीष मल्होत्राही या सोहळ्याला उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून परिणीती आणि राघवच्या डेटींगच्या बातम्या सतत येत आहेत. 

दोघेही यावर कधीच उघडपणे बोलले नसले तरी ते कधी लंच तर कधी एकत्र जेवण करताना दिसले. याशिवाय दोन्ही आयपीएल मॅचेसही एकत्र एन्जॉय करताना दिसले. परिणीती 9 मे रोजी तिचा मित्र राघव चंदासोबत दिल्लीला पोहोचली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com