राधेश्यामच्या रोमॅन्टिक सिनवेळी प्रभासला का फुटत होता घाम?

'राधे श्याम' हा एक रोमॅंटिक चित्रपट असून अनेक रोमॅंटिक सीन्स प्रभासने दिले आहेत.
Prabhas
Prabhas Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रभास स्टारर 'राधे श्याम' (Radhe Shyam) हा चित्रपट 11 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत असून संपूर्ण स्टार कास्ट सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'राधे श्याम' हा एक रोमॅंटिक चित्रपट असून अनेक रोमॅंटिक सीन्स (Romantic Scene) प्रभासने (Prabhas) दिले आहेत. एक मुलाखती दरम्यान प्रभासने सांगितले, त्याला इंटिमेट आणि शर्टलेस सीन करतांना कसे अस्वस्थ वाटते आणि तो सहसा असे सीन टाळतो.

* राधे श्याम मध्ये प्रभासचा रोमॅंटिक लुक पाहायला मिळेल

या चित्रपटामध्ये पूजा हेगडे (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने सांगितले की तो साहसा किसिंग सीन (Kissing Scene) टाळत होता. मात्र स्क्रिप्टची मागणी असल्याने त्याने ते सीन्स केले. प्रभास (Prabhas) अतिशय फिट आहे. त्याने बाहुबलीमध्ये (Bahubali) त्यांची बॉडी फ्लॉंट केली आहे अशी माहिती सांगितली आहे. असे असून सुद्धा त्याचे शरीर फ्लॉंट करण्यात तो अस्वस्थ होतो.

Prabhas
सलमान-कतरिनाच्या 'टायगर 3'चा फर्स्ट लूक पाहिला का?

जेव्हा प्रभास कॅमेरासमोर लिपलॉक सीन किंवा कोणताही रोमॅंटिक सीन (Romantic Scene) करत असतो त्व्ह सेटवर किमान लोक उपस्थित असावेत असा त्याचा प्रयत्न असतो. एका मुलाखती झालेल्या संवादामध्ये प्रभास म्हणाला, दिग्दर्शकाने कथा अशी लिहिली आहे आणि ही एक प्रेमकथा असल्याने मी ती नाकारू शकत नाही. कॉमर्शियल चित्रपटामध्ये (Movie) आपण ते टाळू शकतो पण प्रेमकथामध्ये ते आवश्यक आहे. प्रभास म्हणाला, आताही मला लिपलॉक सीन करतांना आणि शर्ट काढताना अस्वस्थ होतो. मी पाहतो की आजूबाजूला किती लोक आहेत आणि म्हणतो की दुसऱ्या ठिकाणी हा सीन करूया. छत्रपतीमध्येही राजामौलीसरांनी मला माझा शर्ट काढायला लावला होता आणि आता तुम्ही काहीही करू शकता असे सांगितले होते. या चित्रपटाचा ट्रेलर खूप आधीच रिलीज झाला असून तो सोशल मिडियावर (Social Media) चर्चेत असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com