Pushpa 2 Pre-release Earning: अभिनेता अल्लू अर्जुनचा अभिनय आणि चित्रपटाच्या कथेमुळे आपली एक वेगळी छाप सोडणाऱ्या पुष्पाचा दुसरा पार्ट आता लवकरच रिलीज होत आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की आता लवकरच त्यांच्या लाडक्या अभिनेत्याचा चित्रपट त्यांच्या भेटीला येत आहे.
पुष्पा या चित्रपटाची क्रेझ अजूनही लोकांच्या डोक्यात आहे. अशा परिस्थितीत, चाहते अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा: द राइज' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार लवकरच त्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे .
आश्चर्याची गोष्ट अशी की या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटालाही मागे टाकले आहे.
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना आनंदाने उड्या मारायला लावणारी ही बातमी आहे. पुष्पा 2 चे निर्माते थिएटर हक्कांसाठी 1000 कोटींची मागणी करत आहेत. मात्र तमिळ, कन्नड आणि मल्याळम डब व्हर्जन्सची अशी क्रेझ नाही.
चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण हिंदी आणि तेलुगु वर्जनबद्दल जोरदार चर्चा सुरूयत, आणि SS राजामौलीच्या RRR पेक्षा हा चित्रपट अधिक चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे. ज्यांच्या थिएटरच्या राईटसमधुन निर्मात्यांना 900 कोटी रुपये मिळाले.
सुकुमार दिग्दर्शित पुष्पा हा एक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट होता, या चित्रपटाने जगभरात 350 कोटींहून अधिक कमाई केली. फक्त त्याच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींहून अधिक कमाई केली होती.
इंडस्ट्रीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाचा सिक्वेल चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे आणि चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पुष्पा: द राइज हा चित्रपट गेल्या १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात अल्लू अर्जुनने लाल चंदन तस्कर पुष्पराजची भूमिका साकारली होती.
तर रश्मिकाने त्याची प्रेमिका श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. पुष्पा द राइजने केवळ हिंदी पट्ट्यात 110 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता निर्माते चित्रपटाच्या पुढील भागाची तयारी करत आहेत. 2023 च्या अखेरीस पुष्पा 2 रिलीज होण्याची अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.