Happy Birthday Shabir Ahluwalia: 'कयामत' ते 'कुमकुम भाग्य' पर्यंत शब्बीरचा प्रवास

Happy Birthday Shabir Ahluwalia: शब्बीरने त्यानंतर अनेक लोकप्रिय मालिकेत महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
Shabir Ahluwalia
Shabir AhluwaliaDainik Gomantak
Published on
Updated on

Happy Birthday Shabir Ahluwalia: टीव्हीवरचे कलाकार जनसामान्यांच्या अत्यंत जवळचे असतात. टीव्हीवरील मालिकांच्या जगात तर ते रमतातच पण त्याच बरोबर या कलाकारांबरोबर त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध तयार होतो.

मग कलाकारांच्या आयुष्यातील आनंद सामान्यांसाठी उत्सव बनतो. आज अशाच एका लोकप्रिय आणि लाडक्या टीव्हीअभिनेत्याचा वाढदिवस आहे. हा अभिनेता म्हणजे शब्बीर अहलुवालिया आहे.

शब्बीर अहलुवालिया हा आपल्या अभिनयामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता आहे. आज शब्बीर आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिप हिप हुर्रे या मालिकेतून त्याने टीव्ही जगतात पाऊल ठेवले होते. शब्बीरने त्यानंतर अनेक लोकप्रिय मालिकेत महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

एकता कपूरच्या क्यूँ की सास भी कभी बहू थी या लोकप्रिय मालिकेत शब्बीरने महत्वाची भूमिका निभावली होती. त्यानंतर लगेचच रुपाली गांगुलीची प्रसिद्ध मालिका संजीवनीनमध्येदेखील त्याला कास्ट केले होते.

या सगळ्या मालिकेत शब्बीर छोट्या छोट्या रोलमध्ये दिसून आला होता. मात्र कसोटी जिंदगी की या आणखी लोकप्रिय मालिकेने त्याला ब्रेक दिला. मात्र खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळाली ती कयामत या मालिकेतून. कयामत मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकारांनी आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन( Entertainment ) केले आहे.

Shabir Ahluwalia
Sunny Deol Upcoming Movie Gadar 2: गदर 2 ची स्पेशल स्क्रिनिंग; जवान म्हणाले हिंदूस्तान...

कुमकुम भाग्य या मालिकेतून पून्हा एकदा शब्बीरने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. यातील अभि-प्रज्ञाच्या जोडीने मनोरंजन विश्वात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. टीव्ही शो शिवाय शब्बीरने रियालिटी शोदेखील केले आहेत. दरम्यान, शब्बीर सध्या प्यार का पहला नाम: राधा मोहन या मालिकेतून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com