VIDEO: 370 बिर्याणी वाद; प्रणित मोरेची पहिली प्रतिक्रिया, 'आता माझ्या कंटेंटमध्ये बदल दिसेल' म्हणत मागितली माफी

Pranit More apology 370 biryani: सोशल मीडियावर सध्या '३७० रुपयांची बिर्याणी' या प्रकरणावरून कॉमेडियन प्रणीत मोरे मोठ्या वादात सापडला आहे.
Pranit More apology 370 biryani
Pranit More apology 370 biryaniDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर सध्या '३७० रुपयांची बिर्याणी' या प्रकरणावरून कॉमेडियन प्रणीत मोरे मोठ्या वादात सापडला आहे. या वादग्रस्त प्रकरणानंतर प्रणीतचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्याने इन्स्टाग्रामवर हजेरी लावली असून, एका व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे आणि माफी मागितली आहे.

प्रणीत मोरे काय म्हणाला?

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रणीत मोरेने आपली चूक मान्य केली आहे. तो म्हणतो, "काही काळापासून मला तुमच्याशी बोलायचे होते, पण माझे अकाउंट सस्पेंड असल्याने ते शक्य झाले नाही. माझ्या क्राउड वर्क व्हिडिओवर जो रोष व्यक्त केला जात आहे, तो योग्यच आहे असे मला वाटते. त्या वेळी प्रेक्षकांमध्ये असलेल्या त्या व्यक्तीने जे काही आक्षेपार्ह विधान केले, ते चुकीचे होते आणि मला त्याच क्षणी त्याला थांबवायला हवे होते."

Pranit More apology 370 biryani
Goa Drowning: आनंदाचा प्रवास ठरला अखेरचा! दूधसागर नदीत बुडून 4 IIT विद्यार्थ्यांचा मृत्यू; हसत्या-खेळत्या कुटुंबावर काळाचा घाला

चाहत्यांची माफी आणि कायदेशीर सहकार्य

कॉमेडियनने पुढे म्हटले की, "माझ्या चुकीच्या निर्णयामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. सध्या या प्रकरणाबाबत जी काही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, त्यात मी संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहे. मी केवळ एक विनंती करतो की, मला पुन्हा एकदा सुधारण्याची संधी द्या. मी एक चांगला माणूस आणि उत्तम कलाकार बनण्याचा प्रयत्न करेन. हे प्रकरण माझ्यासाठी एक मोठी शिकवण असून, भविष्यात माझ्या कंटेंटमध्ये नक्कीच बदल दिसून येईल."

Pranit More apology 370 biryani
Goa Police: दोषींवर फौजदारी कारवाई करा; मारहाण प्रकरणी ॲड. कार्लुस फेरेरा यांच्याकडून अटकेची मागणी

नेमके प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी गुरुग्राममध्ये प्रणीत मोरेचा एक लाइव्ह शो पार पडला होता. या शोदरम्यान हिमांशु जांगरा नावाच्या एका प्रेक्षकाने आपल्या डेटिंगबद्दलचे अनुभव सांगताना महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. प्रणीत मोरेने त्याला न टोकता उलट त्याला अधिक माहिती विचारून प्रोत्साहित केले. शोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दोघांवरही जोरदार टीका केली होती आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com