Prakasha Raj :"ऑस्कर सोड भास्करही मिळणार नाही" प्रकाशराज यांची द कश्मीर फाईल्सवर टीका

अभिनेते प्रकाशराज यांनी विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर जोरदार टीका केली आहे.
Prakashraj
Vivek Agnihotri
Prakashraj Vivek Agnihotri Dainik Gomantak
Published on
Updated on

Prakasha Raj: विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासूनच अनेक टीका आणि वादांना तोंड देत आहे. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता आणि आतापर्यंत हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आला आहे.

पंचवीस कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली असेल, पण त्यावर टीका आणि वादही झाले.

 काही काळापूर्वी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स'चे वर्णन 'स्वस्त प्रोपोगंडा' चित्रपट म्हणून केले होते, आता अभिनेता प्रकाश राज यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

केरळमध्ये नुकत्याच झालेल्या मातृभूमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ लेटर्समध्ये प्रकाश राज उपस्थित होते. येथे त्यांनी द काश्मीर फाइल्सवर बरीच टीका केली आणि याला 'नॉनसेन्स' चित्रपट म्हटले.

प्रकाश राज हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक बेधडक स्टार आहेत. राजकीय ते सामाजिक अशा सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर ते आपले मत मांडत असतात. 

साऊथशिवाय बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले प्रकाश राज यांनी 'द काश्मीर फाइल्स'वर आंतरराष्ट्रीय ज्युरी थुंकल्याचं म्हटलं. या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही त्यांनी निर्लज्ज म्हटले आहे

प्रकाश राज म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' हा सर्वात मूर्ख आणि बकवास चित्रपट आहे. पण त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. निर्लज्ज. आंतरराष्ट्रीय ज्युरीही त्याच्यावर थुंकतात. मला ऑस्कर का मिळत नाही, असा सवाल दिग्दर्शक करत आहेत. त्याला भास्करही मिळणार नाही. 

मी सांगतो का? कारण आपल्याकडेही इथे संवेदनशील माध्यमे आहेत. आणि तुम्ही इथे प्रोपगंडा फिल्म बनवत आहात. माझ्या सूत्रांनुसार, त्याने असा चित्रपट बनवण्यासाठी 2000 कोटींची गुंतवणूक केली. पण तुम्ही लोकांना कायमचे मूर्ख बनवू शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com