'जय भीम' सिनेमातील प्रकाशराज यांचा 'तो' सीन वादग्रस्त

वादावर बोलताना अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्याला अभिमान असल्याचे केले जाहीर
Tamil Cinema Jai Bhim Poster
Tamil Cinema Jai Bhim PosterDainik Gomantak

Jai Bhim: तमिळ सिनेमा 'जय भीम' मधल्या एका दृष्या वरून सध्या वादग्रस्त चर्चा सुरू आहे तमिळ सुपरस्टार सूर्या (Superstar Suriya) यांची मुख्य भूमिका या सिनेमात आहे. 2 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या जय-भीम सिनेमातल्या एका दृश्यात एका हिंदी भाषिक व्यक्तीला आयजीच्या भूमिकेत असलेले प्रकाश राजका कानाखाली मारतात. त्यावर ती व्यक्ती प्रश्न विचारते की मला का मारलं त्यावर प्रकाश राज तमिळमध्ये बोल असे म्हणतात. ही दृष्य सिनेमातून हटवण्याची मागणी केली जातेय. या सिनेमाचे दिग्दर्शक टी जे ज्ञानवेल आहेत.

Tamil Cinema Jai Bhim Poster
'या' कलाकारांची रियल लाइफ केमेस्ट्री ऑन स्क्रीन दिसून आली

सिने समीक्षक रोहित जैस्वाल यांनी हा सीन पाहून दुःख झाल्याचे म्हटले ते लिहितात आम्ही त्यामुळे सिनेमाची वाट पाहत असतो त्यांना सपोर्ट करतो निर्मात्यांनी हेही सांगतो की तुम्ही संपूर्ण देशासाठी सिनेमे रिलीज करा आणि त्या बदल्यात आम्हाला फक्त प्रेमाची अपेक्षा असते. पण या सीनमुळे मला वाईट वाटलं. या दृश्याची गरज नव्हती. अपेक्षा आहे की हे दृश्य हटवले जाईल. काही मी या दृश्यावर टीका केली असली तरी, काही या सिनेमाची पाठराखण सोशल मीडियावर करताना दिसतात. पण या वादावर बोलताना अभिनेते प्रकाश राज यांनी आपण या सिनेमाचा भाग असल्याचा आपल्याला अभिमान आहे असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com