'या' कलाकारांची रियल लाइफ केमेस्ट्री ऑन स्क्रीन दिसून आली

नेहुप्रीतच नवीन 'दो गल्ला' गाणं झाल रिलीज
Neha Kakkar and Rohanpreet Singh
Neha Kakkar and Rohanpreet SinghDainik Gomantak

बॉलीवुड मधील फेमस सिंगर नेहा कक्कड युवा पिढी मधील आवडीची सिंगर आहे, त्याच बरोबर रोहनप्रीत क्युटनेसच्या बाबतीत मुलींमध्ये प्रचंड फेमस आहे. दोघेही पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफ खुप एन्जॉय करत असतात. ‘नेहु दा व्याह’ आणि ‘ख्याल रख्या कर’ या हिट गाण्यानंतर नेहा आणि रोहन चाहत्यांसाठी नवीन रोमँटिक गाणे घेऊन आले आहेत.

'दो गल्ला' हे गाण पंजाब मधील फेमस सिंगर गैरी संधु याचे आहे, या गाण्याला नेहुप्रीतने त्यांच्या शैली मध्ये गायले आहे. गाण्याची सुरुवात एका पार्टी पासुन होते नेहा गाणं म्हणत असते आणि रोहन पियानो वाजवताना दिसुन येतो. नेहाने आपल्या इंस्टाग्रामवर गाण्याची छोटीशी झलक शेअर केली आहे.

Neha Kakkar and Rohanpreet Singh
कंगना-करणमध्ये पुन्हा वादाची ठिणगी,व्हिडिओ झाला व्हायरल...

याआधी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांनी या गाण्याचे पोस्टर रिलीज करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते आणि हे गाणे 03 नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. गॅरी संधूने हे गाणे कंपोज केले आहे. नेहा आणि रोहन यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. हे गाणे रजत नागपाल यांनी रिक्रिएट केले असून राजन बीर यांनी दिग्दर्शित केले आहे.

नेहाने नुकताच उदयपूरमध्ये तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सिंगरने त्याचे काही फोटोही सोशल मिडीया वरती शेअर केले आहेत. यापूर्वी नेहाचे 'काटा लगा' गाणे रिलीज झाले होते ज्यामध्ये ती टोनी कक्कर आणि हनी सिंग सोबत दिसुन येते. चाहत्यांकडून या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com