Allu Arjun Video: अभिनेता अल्लू अर्जुनचा साधेपणा; सूवर्ण मंदिरात दर्शनासाठी उभा राहिला रांगेत

अल्लू अर्जुन आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अमृतसर येथील प्रसिद्ध सूवर्ण मंदिरात गेला.
Allu Arjun Visit Golden Temple
Allu Arjun Visit Golden TempleDainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेता अल्लू अर्जुन सध्या विविध चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. 'पुष्पा' (Pushpa) सिनेमा प्रचंड गाजल्यानंतर त्याचा दुसरा भाग कधी येणार याची प्रतिक्षा देखील सिनेरसिकांना लागली आहे. 'पुष्पा2' सिनेमाचे देखील लवकरच चित्रिकरण सुरू होणार आहे. दरम्यान, अल्लू अर्जुन (Allu Arjun) आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अमृतसर येथील प्रसिद्ध सूवर्ण मंदिरात (Golden Temple) गेला. अभिनेता आपली पत्नी आणि मुलांसह दर्शनरांगेत उभा राहिला याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Allu Arjun Visit Golden Temple
ऐश्वर्या रायच्या 'Ponniyin Selvan-1' ने रिलीज होण्याआधीच केली करोडोंची कमाई

अल्लू अर्जुन (Allu Arjun ) याची पत्नी स्नेहा रेड्डी हीचा 29 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. अभिनेता आपली पत्नी आणि मुलांसह अमृतसर येथील प्रसिद्ध सूवर्ण मंदिरात गेला होता. यावेळी अल्लू अर्जुन VIP लाईन किंवा विशेष सवलत घेउन दर्शनाला न जाता, सर्वांसह लाईनमध्ये उभा राहिला व दर्शन घेतले. यावेळी अल्लू अर्जुनने आपल्या डोक्यावर प्रथेप्रमाणे सफेद आणि केसरी कपडा बांधल्याचे दिसत आहे. लोकं सध्या अल्लू अर्जुनच्या या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

अल्लू अर्जुनच्या 2021 साली आलेल्या 'पुष्पा' या सिनेमाने सर्वत्र धुमाकूळ घातला. हा सिनेमा अनेक भाषांमध्ये डब करण्यात आला. देशासह विदेशातही सिनेमाची क्रेझ पहायला मिळाली. लाल चंदन तस्करीवर आधारित या सिनेमाचा दुसरा भार लककरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाची तयारी सुरू असून, ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून चित्रिकरणाला सुरूवात होईल.

दरम्यान, अल्लू अर्जुनसह सर्वच सिनेरसिक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com