Pooja Bhatt
Pooja BhattDainik Gomantak

Pooja Bhatt : "तुझे वडील कधी परवीन बाबीच्या" महेश भट्ट यांच्यावर ही कमेंट येताच इन्स्टाग्राम यूजरवर भडकली पूजा भट्ट

अभिनेत्री पूजा भट्ट इन्स्टाग्रामवर एका यूजरवर चांगलीच भडकली आहे.
Published on

गेल्या काही काळात अभिनेत्री पूजा भट्ट बिग बॉसमुळे चर्चेत होती. सलमानसमोर रडतानाचा तिचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.

बिग बॉसमध्ये पूजाने आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलही सांगितले होते. आपल्या घटस्फोटाबद्दलही पूजाने या शो मध्ये सांगितले होते.

पूजा नेहमीच आपल्या स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी सोशल मिडीयावर चर्चेत असते. आता पूजाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे इन्स्टाग्रामवर आलेल्या एका कमेंटने पूजा चांगलीच भडकली आहे. चला पाहुया नेमकं काय घडलंय.

इन्स्टाग्रामवर काय झालं?

पूजा भट्ट सोशल मिडीयावर नेहमी आपले फोटो आणि आठवणी शेअर करत असते. यावेळी एका युजरने केलेल्या कमेंटमुळे पूजाचा पारा चढला आणि तिने कमेंट सेक्शनमध्ये त्या यूजरचा चांगलाच समाचार घेतला. पूजा भट्टने तिचे वडील-चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या एका इन्स्टाग्राम युजरला उत्तर दिले आहे. 

शनिवारी (2 सप्टेंबर) इन्स्टाग्रामवर जाताना पूजाने एका बुककेसजवळ उभा असलेला तिचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर आलेल्या अपमानास्पद कमेंटमुळेच पूजा संतप्त झाली आणि तिने यूजरला खडे बोल सुनावले.

पूजाची पोस्ट काय होती?

पूजाने शेअर केलेल्या एका फोटोवर एक कमेंट आली. तिने पोस्टवर साखळदंडाने बांधलेल्या हत्तीचा फोटो असलेला काळा टी-शर्ट घातला होता. या टी शर्ट वर लिहिलं होतं, "मुक्त जॉयमाला". 

तिने पोस्टला कॅप्शन दिले, "#BiggBosOTT2 घरामध्ये माझ्या एकुण कालावधीवर आणि त्यानंतरच्या फ्रीडमबद्दल माझं अधिक कौतुक करा. कृपया एकत्र या आणि जयमाला मुक्त करण्यासाठी सामूहिक शक्तीचा वापर करा."

"तुझे वडील कधी परवीन बाबीच्या"

पूजाच्या या पोस्टवर अनेक यूजर्सच्या कमेंट होत्या. पण एक कमेंट अशी होती ज्यावर प्रतिक्रिया देण्यापासून पूजा स्वत:ला आवरू शकली नाही. सेक्शनमध्ये एका व्यक्तीने लिहिले, “तुमचे वडील अंधाऱ्या रात्री त्यांच्या मागे धावत नग्न परवीन बाबीचे किस्से सांगत आहेत. त्याचा अहंकार शांत करण्यासाठी. 

तुम्हाला खात्री आहे की महेश भट्ट यांनी कधीही त्यांचा अहंकार तृप्त करण्यासाठी तुमच्या शरीराचा वापर केला नाही? किती विडंबन आहे अरे देवा. 

लोक त्यांच्या अहंकार आणि पराक्रमांना संतुष्ट करण्यासाठी एखाद्याच्या निष्पाप भावनांचा वापर करू शकतात. आणि मग स्वतःला देवाचे पुत्र म्हणवून मोकळेपणाने फिरतात.”

पूजाचे उत्तर

महेश भट्ट आणि परवीन बाबी यांचे नाव येताच साहजिकच पूजा भडकली आणि तिने रागाच्या भरात उत्तर दिले,, "देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमच्या आंधळ्या द्वेषातून तुमची सुटका करो. तुम्हाला शुभेच्छा." 

पूजाच्या एका चाहत्याने कमेंट केली, “अशा नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करा मॅम आम्ही सर्व तुमच्यावर प्रेम करतो.” "तुम्ही बर्‍याच लोकांसाठी प्रेरणा आहात ... राणीप्रमाणे गोष्टी हाताळत राहा,".

यूजर्सच्या कमेंटस

महेश भट्ट यांच्याबद्दल अशी कमेंट येताच पूजाच्या चाहत्यांनीही त्या यूजरला उत्तर द्यायला सुरूवात केली. "एखाद्याच्या वडिलांबद्दल हे लिहायला लाज वाटते का?.

जर तुला कोणी काही बोलले असेल तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मुलीसाठी आणि तिच्या वडिलांसाठी असे घाणेरडे शब्द बोलु नका," . एका चाहत्याने असेही लिहिले, "जर तुम्हाला काही चांगले बोलता येत नसेल तर काहीही बोलू नका."

यूजर म्हणाला

"हसा आणि तुमचा द्वेष करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, द्वेष माणसाला मारून टाकतो. तुम्ही अनेक लोकांसाठी प्रेरणा आहात." "तुम्ही एखाद्या सोशल प्लॅटफॉर्मवर एखाद्याला, विशेषत: तुम्ही एक स्त्री असून, एका स्त्रीला कसे बदनाम करू शकता? तुम्हाला दुसऱ्यांना काहीही म्हणण्याचा अधिकार नाही. कृपया त्यापासून स्वतःला दूर ठेवा आणि द्वेष पसरवू नका," .

Pooja Bhatt
Jawan Advance Booking : 3 दिवसांत 2 लाख तिकीट विकली...जवानचा रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर कल्ला..

पूजा भट्ट आणि बिग बॉस

अलीकडेच, पूजा बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये दिसली होती. एल्विश यादव, मनीषा राणी, बेबीका ध्रुव आणि अभिषेक मल्हान यांच्यासमवेत अंतिम फेरीसाठी पात्र झाल्यानंतर, पूजा विजयी शर्यतीतून बाहेर होती. 

बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन 17 जून रोजी सुरू झाला. स्पर्धकांमध्ये अविनाश सचदेव, पलक पुरस्वानी, बेबीका धुर्वे, जिया शंकर, आलिया सिद्दीकी, फलक नाझ, आकांक्षा पुरी, जाद हदीद, सायरस ब्रोचा हे होते.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com