गेल्या काही दिवसांपासुन मनोरंजन विश्वात आणि दिल्लीच्या राजकारणात एका विशेष लग्नाची चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तारीख आता समोर आली असुन लवकरच लग्नाचा मंगल दिवस लवकरच उगवणार आहे. 23 सप्टेंबरला दोघेही विवाहबंधनात अडकतील.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे.सध्या दोन्ही कुटूंबांकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबरपासून परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या विधी अरदास आणि शब्द कीर्तनाने सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये मोठा क्रिकेट सामना होणार असल्याचे बोलले जात आहे. हा सामना दिल्लीत होणार असून त्यासोबत लग्नसोहळ्याला मोठ्या थाटामाटात सुरुवात होणार आहे.
राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा 20 सप्टेंबर रोजी एक सूफी रात्री आयोजित करणार आहेत, ज्यामध्ये अनेक नेते आणि सेलिब्रिटी उपस्थित असल्याची माहिती आहे.
यासोबतच परिणीती आणि राघवच्या कुटुंबियांमध्ये क्रिकेट मॅचही आयोजित केली जाणार आहे.
ETimes च्या वृत्तानुसार नुसार, एका सूत्राने सांगितले की, अरदास आणि कीर्तनाव्यतिरिक्त, उत्सवात एक मजेदार भाग देखील जोडला गेला आहे.
परिणीती आणि राघवच्या कुटुंबात क्रिकेट सामना होणार आहे, म्हणजेच चोप्रा विरुद्ध चड्ढा यांच्या टीम तयार केल्या जातील. या क्रिकेट सामन्यात दोघांचे मित्रही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
परिणीती आणि राघव चढ्ढा या दोघांनाही खेळ विशेषत: क्रिकेट आवडत असल्याची माहिती आहे. मे 2023 मध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा मोहाली स्टेडियमवर आयपीएल सामन्याचा आनंद घेताना दिसले होते.
परिणीती आणि राघव 23 सप्टेंबर रोजी उदयपूरला जाणार आहेत. तेथे हे दोघे 24 तारखेला लीला पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.
24 सप्टेंबरला सेहराबंदीनंतर राघव चड्ढा आपल्या नववधूला आणण्यासाठी बोटीने लीला पॅलेसमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता एक भव्य लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.