Parineeti- Raghav Wedding: ठरलं तर मग! 'या' ठिकाणी पार पडणार परिणिती अन् राघवच्या लग्नाचा शाही थाट

Parineeti- Raghav Wedding: हे पंजाबी लग्न मोठ्या गाजावाजा करत पार पडणार असल्याची माहीती समोर आली आहे.
Parineeti Chopra-Raghav Chadha
Parineeti Chopra-Raghav ChadhaDainik Gomantak
Published on
Updated on

Parineeti- Raghav Wedding: बॉलीवूडच्या कलाकारांचे लग्न म्हणजे चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो. आता लवकरच आणखी एक अभनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. ती अभिनेत्री म्हणजे परिणीती चोप्रा होय. परिणीती आणि राघव चड्डा लवकरच लग्नगाठ बांधणार असून लग्नाची तयारी जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

कुठे होणार लग्न?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टी ( आप ) चे खासदार राघव चड्डा यांचे लग्न उदयपूरमध्ये होणार आहे. महत्वाचे म्हणजे, हा लग्नसमारंभाचा कार्यक्रम आठवडाभर चालणार आहे. १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र परिणीती आणि राघव दोघांनीही यावर कोणतेही भाष्य केले नाही.

हिंदूस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, हे लग्न उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पार पडणार आहे. या शाही लग्नात जवळची मित्रमंडळी आणि कुटुंबिय या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. हे पंजाबी लग्न मोठ्या गाजावाजा करत पार पडणार असल्याची माहीती समोर आली आहे.

Parineeti Chopra-Raghav Chadha
आता ज्युनिअर NTR बनणार तारासिंह? गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले....

मिळालेल्या माहीतीनुसार, राघव आणि परिणीतीने आपल्या पाहुण्यांसाठी खास व्यवस्था केली आहे. काही दिवसांपूर्वीच तयारी व्यवस्थित सुरु आहे की नाही हे पाहण्यासाठी उदयपूरला गेले होते. याबरोबरच, श्रावणात उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आशिर्वाद घेताना दिसून आले होते.

दरम्यान, राघव( Raghav Chadda ) आणि परिणीती चा साखरपुडा १४ मे ला झाला होता. आता चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता असून आता हे शाही लग्न कसे पार पडणार आणि इतर कलाकारांपेक्षा यामध्ये काय वेगळे असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com