आता ज्युनिअर NTR बनणार तारासिंह? गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले....

गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी भविष्यात गदर बनवला तर तारासिंहच्या भूमीकेसाठी त्यांची निवड NTR असेल असे संकेत दिले आहेत.
Anil Sharma
Anil SharmaDainik Gomantak

Director Anil Sharma on Gadar 2 Casting : अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलचा गदर 2 सध्या बॉक्स ऑफिसवरच्या कोटींच्या उड्डाणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. 2001 साली आलेल्या 'गदर'चा सिक्वल असणाऱ्या या चित्रपटाने आपल्या कथेने प्रेक्षकांना भुरळ घालण्यात चांगलेच यश मिळवले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा, मुख्य अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गेल्या काही दिवसांपासुन व्यस्त होते. 11 ऑगस्ट रोजी चित्रपट रिलीज झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले ओपनिंग केले.

रिलीजनंतरही गदर 2 चे प्रमोशन सुरूच राहिले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक अनिल शर्मा गदर चित्रपटाच्या भविष्यातल्या कास्टींगवर बोलले आहेत.

ज्युनिअर NTR साकारणार तारासिंह

अनिल शर्मा एका नवीन मुलाखतीत बॉलीवूड हंगामाशी बोलत होते. या मुलाखतीत त्यांना गदर एक प्रेम कथा आणि गदर 2 मध्ये तारा सिंगची भूमिका करणाऱ्या सनी देओल व्यतिरिक्त - तारा सिंगच्या भूमिका आणखी कोण करु शकेल? असा प्रश्न विचारला होता.

या प्रश्नावर उत्तर देताना चित्रपट निर्माते अनिल शर्मांनी म्हटले आहे की तेलुगू अभिनेता ज्युनियर एनटीआर त्याच्या हिट गदर फ्रेंचायझीमध्ये तारा सिंगची भूमिका साकारू शकतो.

गदरच्या तारासिंहसाठी ज्युनिअर NTR चा विचार स्वत: दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे.

तारासिंहच्या भूमीकेसाठी

तारासिंहच्या भूमीकेसाठी मला आताच्या तरुण कलाकारांमध्ये कुणीही दिसत नाही असंही अनिल शर्मा म्हणाले.

अनिल शर्मा म्हणाले "मला मुंबईमध्ये कोणी दिसत नाही. कदाचित दक्षिणेत, ज्युनियर एनटीआर तारासिंह प्ले करू शकेल; त्यांच्याकडे अशी प्रतिमा आहे जी तारासिंहची भूमीका साकारू शकते."

ट्रोलर्सना मी प्रतिसाद देत नाही

ट्रोलिंगबद्दल विचारलं तेव्हा म्हटले आहे की ट्रोल्सला प्रतिसाद देण्याचा माझा आवडता मार्ग म्हणजे अजिबात प्रतिसाद न देणे, त्यामुळे ट्रोलर्सचा हेतू साध्य होत नाही. अनिल शर्मा यांनी असेही सांगितले की, गदर 2 सात वेळा पाहिला आहे आणि बरेच लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये देखील जातात, जेव्हा त्यांना गदर 2 च्या यशोगाथेबद्दल सांगितले जाते.

 गदर 3 मध्ये सनी आजोबांची भूमिका साकारणार आहे का हे देखील त्याला विचारण्यात आले होते, परंतु अनिल शर्माने स्पष्टपणे सांगितले की तो गदर 3 बद्दल बोलणार नाही आणि योग्य वेळ आल्यावर मी यावर खुलासा करेन.

ज्युनियर एनटीआर

ज्युनियर एनटीआर , नंदामुरी तारका रामाराव ज्युनियर उर्फ ​​तारक RRR चित्रपटामुळे देशभरातल्या प्रेक्षकांच्या नजरेत आला. एसएस राजामौली यांच्या आरआरआरसाठी त्याला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. RRR मध्ये NTR ने राम चरण सोबत मुख्य भूमिका केली होती. तो अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा नातू आहे.

Anil Sharma
Gary wright : पार्किन्सन आजाराशी सुरांच्या बादशाहाची झुंज संपली, संगीतकार गॅरी राईट यांचे निधन

गदर 2 ची स्टारकास्ट

2001 साली आलेला गदर हा पहिला चित्रपट 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित होता, तर नवीन चित्रपट भारत-पाक तणावावर देखील आधारित आहे आणि 1971 च्या युद्धाच्या उभारणीत दोन्ही राष्ट्रांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. 

सनी देओल, उत्कर्ष शर्मा आणि अमिषा पटेल यांनी गदर २ मध्ये तारा सिंग, जीते आणि सकीनाच्या भूमिका पुन्हा केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com