
Panchayat Bhushan Viral Video: प्राइम व्हिडीओवर सध्या 'पंचायत' वेबसिरीजचा बोलबाला आहे. फुलोरा गावातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे, पण या वेळी बनराकस म्हणजेच भूषण या भूमिकेने अक्षरशः शो जिंकून घेतल्याच्या चर्चा आहेत. आमदारजी आणि आपल्या सगळ्या युक्त्या वापरून अखेर प्रधानकीची निवडणूक जिंकलेल्या भूषणचा आनंद गगनात मावत नव्हता. विजयाच्या या आनंदात त्याने असा जबरदस्त डान्स केला की, त्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
व्हायरल झालेल्या या डान्स व्हिडिओमध्ये आमदारजी आणि विनोद यांच्या डान्स स्टेप्सची खूप चर्चा झाली, पण यांच्यात बनराकसही मागे राहिला नाही. त्याने मायकेल जॅक्सनची सिग्नेचर स्टेप करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पण आता बनराकसचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आणि हा व्हिडिओ बनराकसची भूमिका साकारणारे जबरदस्त अभिनेते दुर्गेश कुमार याचा आहे.
एका सोशल मीडिया यूजरने दुर्गेश कुमार यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 'हिरोईन ओ हिरोईन' या भोजपुरी गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसत आहेत. त्याची बेधडक डान्स स्टाइल प्रेक्षकांना खूप आवडली असून, हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
या व्लॉगरने 'पंचायत ४' च्या शूटिंगदरम्यानचे अनेक बियॉन्ड द सीन्स व्हिडिओही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यापैकीच एक व्हिडिओ शेवटच्या भागातील डान्स सिक्वेन्सचा आहे, ज्यात भूषणची भूमिका साकारणारे दुर्गेश कुमार जबरदस्त नाचताना दिसत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शूटिंगदरम्यानचा हा व्हिडिओ शोमध्ये प्रसारित झाल्यानंतर आणखी जास्त व्हायरल झाला आहे. यावरून प्रेक्षकांना हा शो आणि त्यातील पात्रे किती आवडतात हे दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.