
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज एम. एस. धोनीने आपल्या खेळाच्या शैलीने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. त्याच्या 'कूल' स्वभावाबरोबरच त्याचा 'हेलिकॉप्टर शॉट' हेही क्रिकेटमधील एक अनोखं आकर्षण ठरलं आहे. त्यामुळे आज देशभरातील अनेक मुलांचे तो आदर्श बनला आहे. सध्या, एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये तो चिमुकला धोनीप्रमाणे अचूक हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसतो. त्याने हा शॉट इतक्या परिपक्वतेने आणि स्टाईलने खेळला की व्हिडिओ पाहणारे सगळेच थक्क झाले आहेत.
त्याचबरोबर त्याने विराट कोहलीसारखा सुंदर कव्हर ड्राईव्ह देखील खेळला आहे. कोहलीचा कव्हर ड्राईव्ह जगप्रसिद्ध आहे, पण हा चिमुकला पाहून अनेकजण कमेंटमध्ये म्हणत आहेक की, “जर विराटने हा शॉट पाहिला, तर तो देखील या मुलाचा फॅन होईल.”
५८ दशलक्ष लोकांनी पाहिला व्हिडिओ
‘Physical Education With Ashish’ या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून, तो आतापर्यंत तब्बल ५८ दशलक्षहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच ६ लाखांहून अधिक लाईक्स आणि ५ हजारांहून अधिक प्रतिक्रिया या व्हिडिओवर मिळाल्या आहेत.
एका वापरकर्त्याने कौतुक करत लिहिले, "भाऊ, हा एक अद्भुत मुलगा आहे. त्याला कदाचित अजून दुधाचे दात आले नसतील पण तो कॉपी बुक स्टाईलमध्ये क्रिकेटचे शॉट्स खेळतोय. आश्चर्यकारक, जबरदस्त, अविश्वसनीय!"
भारताच्या प्रत्येक शहरात, गावात आणि अगदी खेड्यापाड्यातही तुम्हाला क्रिकेट खेळणारी मुलं दिसतील. प्लास्टिकचा बॉल, कधी जुनी बॅट, कधी स्टंपच्या जागी दगड ठेवून खेळ सुरू होतो. आणि या खेळताना त्या लहानग्यांचे डोळे स्वप्नांनी भरलेले असतात.
कोणी सचिन होण्याचं स्वप्न पाहतो, कोणी विराट कोहलीसारखी बॅटिंग करायची इच्छा बाळगतो, तर कोणी धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक मुलांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.