Pakistani Serial Tere Bin
Pakistani Serial Tere BinDainik Gomantak

Pakistani Serial Tere Bin: "हे पहिल्यांदा होत नाहीये !" पाकिस्तानी मालिका 'तेरे बिन' च्या मॅरिटल रेप सीनवर लेखिका ठाम...

पाकिस्तानसह भारतात प्रसिद्ध असलेल्या तेरे बिन ही सिरीयल आता वादात सापडली आहे.

Pakistani Serial Tere Bin: पाकिस्तानी मालिका 'तेरे बिन'ला भारतात भरभरून प्रेम मिळत असतानाच आता या शोवर लोकांचा रोष उफाळून आला आहे.

युमना झैदी आणि वहाज अलीच्या शोमध्ये 'वैवाहिक बलात्कार' दाखवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे आणि आगामी एपिसोडचा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांची तारांबळ उडाली आहे.

 निर्मात्यांनी शोची कथा खराब केली आहे आणि आता तो मालिका पाहणार नाही असेही त्याने म्हटले आहे. या सर्व वादांमध्ये आता शोची लेखिका नूरन मखदूमची प्रतिक्रिया समोर आली आहे, मात्र त्यांनी जे काही बोलले ते ऐकून लोक हैराण झाले आहेत. नूरन म्हणाली की, 'पडद्यावर हे पहिल्यांदाच घडत नाहीये'.

आगामी एपिसोड धक्कादायक

तेरे बिन मालिकेच्या 46 व्या भागाच्या शेवटच्या सीनमध्ये , मुर्तसिम खान (वाहज अली) त्याची पत्नी मीराब (युमना जैदी) सोबत काहीतरी चुकीचे करणार असल्याचे दाखवण्यात आले होते. तो दरवाजा बंद करतो आणि एपिसोड तिथेच संपतो. 

त्यानंतर आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये मीरब उदास अवस्थेत बेडजवळ बसलेली आहे आणि मुर्तसिम रागाने काच फोडतो असे दाखवण्यात आले आहे.

बायकोशी काही चुकीचं केल्याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हे दृश्य पाहून प्रेक्षक दुखावले गेले, त्यांना मोठा धक्का बसला आहे.

संपूर्ण कथेची वाट पाहा असं म्हणते लेखिका

मुर्तसिमच्या व्यक्तिरेखेला खूप प्रेम मिळत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे, अशा परिस्थितीत लेखिका नूरन मखदूम यांनी मुद्दाम त्याला नकारात्मक दाखवण्यासाठी हे केले आहे. मात्र, टीकेनंतर आता नूरन स्वत: पुढे येऊन या सीनबद्दल उघडपणे बोलली आहे.

नूरन मखदूमने अरब न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'ही अशी परिस्थिती आहे, जी सीरियलची मागणी होती आणि ती क्लायमॅक्सवर नेईल.

जर प्रेक्षकांना ते समजू शकत नसेल तर मी ते बदलू शकत नाही. हे फक्त नाटक आहे. प्रत्येक भागाचा मुद्दा बनवण्याऐवजी त्यांनी संपूर्ण कथा उलगडण्याची वाट पहावी.

हे पहिल्यांदा घडतंय का?

नूरन पुढे म्हणाली की कंटेंट टीम किंवा प्रोडक्शन हाऊसने नवीन कथेवर आक्षेप घेतला नाही. ती म्हणाली, 'असे नाही की हे पडद्यावर पहिल्यांदाच घडले आहे.

या सिरीयलला खूप प्रसिद्धी मिळाली आहे आणि लोकांनी या ट्विस्टवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शूटिंगदरम्यान सीनमध्ये बदल करण्यात आला होता

नूरनने पुढे खुलासा केला की मागील एपिसोडमधील थुंकणे आणि थप्पड मारण्याचे सीन मूळ स्क्रिप्टमध्ये समाविष्ट केलेले नाहीत. शूटिंगदरम्यान त्यात बदल करण्यात आला. नूरन सीन आणि स्क्रिप्टचं समर्थन करत आहे. 

ती म्हणते, 'माझ्या सामाजिक जबाबदारीबद्दल बोलाल तर मी एक कथा तयार केली आहे आणि मी तिच्या पाठीशी उभी आहे. आणि ही काही असामान्य घटना नाही, यापूर्वीही घडली आहे.

याआधी इम्रान अश्रफ आणि इकरा अजीज यांचा लोकप्रिय शो 'रांझा रांझा करडी' या शोमध्येही मॅरिटल रेपचा सीन दाखवण्यात आले होते तेव्हा त्यावरही जोरदार टीका झाली होती.

Pakistani Serial Tere Bin
Drishyam Remake in Korean : चीन,इंडोनेशियानंंतर आता या भाषेत होणार दृश्चमचा रिमेक...

युट्यूबवर पाहु शकता ही मालिका

ही प्रसिद्ध पाकिस्तानी मालिका 'तेरे बिन' तुम्ही जिओ टीव्हीवर पाहू शकता. भारतात तुम्ही ते यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. हा शो 28 डिसेंबर 2022 पासून प्रसारित होणार आहे. या मालिकेचे पाकिस्तानप्रमाणेच भारतातही प्रचंड चाहते आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com