How to make Rakhi At Home: रक्षाबंधनाला घरीच बनवा 10 मिनिटांत सुंदर राखी! भावाला आवडेल तुमची क्रिएटिव्हिटी अन् मिळेल खास गिफ्ट

Sameer Amunekar

साहित्य तयार ठेवा

रंगीत रिबन, सजावटीचे मोती, छोटे मणी, लेस, गोंद आणि कात्री एवढे साहित्य आधीच जवळ ठेवा.

How to Make Rakhi at Home | Dainik Gomantak

रिबनचा तुकडा कापा

भावाच्या मनगटाला आरामात बसेल एवढी रिबन कापून घ्या. दोन्ही बाजूंना थोडी जास्त लांबी ठेवा.

How to Make Rakhi at Home | Dainik Gomantak

मध्यभागी डिझाइन तयार करा

रिबनच्या मध्यभागी छोटा सजावटीचा मणी, मोती किंवा सुंदर स्टोन गोंदाने चिकटवा.

How to Make Rakhi at Home | Dainik Gomantak

लेस आणि मण्यांनी सजवा

राखी अधिक आकर्षक दिसण्यासाठी बाजूला छोटी लेस किंवा रंगीत मणी लावा. खूप जड सजावट टाळा.

How to Make Rakhi at Home | Dainik Gomantak

गोंद व्यवस्थित सुकू द्या

सर्व साहित्य चिकटवल्यानंतर काही मिनिटे राखी तशीच ठेवा, जेणेकरून सजावट व्यवस्थित सेट होईल.

How to Make Rakhi at Home | Dainik Gomantak

फिनिशिंग करा

रिबनच्या दोन्ही टोकांना नीट कापून घ्या. गरज असल्यास छोट्या मण्यांनी किंवा धाग्याने टोकांची सजावट करा.

How to Make Rakhi at Home | Dainik Gomantak

भावाला बांधा आणि खास सरप्राइज द्या

तयार झालेली राखी भावाच्या मनगटावर बांधा. स्वतःच्या हाताने बनवलेली राखी पाहून त्याला नक्कीच आनंद होईल!

How to Make Rakhi at Home | Dainik Gomantak

चाळीशीतही विशीतल्यासारखं दिसायचं? घरच्या घरी करून पाहा 'हे' कोरियन ब्युटी सीक्रेट्स

येथे क्लिक करा