'हेड, शोल्डर्स, नीड्स अँड टोज' वर थिरकली पी व्ही सिंधू

पीव्ही सिंधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
p v sindhu
p v sindhuDainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या आक्रमक खेळीने कमी कालावधीत जगभर दरारा निर्माण करणारी भारतीय शटलर पी व्ही सिंधूचा डान्स सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. पीव्ही सिंधू इन्स्टाग्रामवर नेहमीच आपले फोटो शेअर करत असते. आता मात्र तिने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पीव्ही सिंधू हेड, शोल्डर्स, नीड्स अँड टोज या ट्रेंडिंग गाण्यावर सुंदर स्टेप करताना दिसते आहे. ( p v Sindhu done dances on latest trend song 'head shoulder knees and toes' )

p v sindhu
हा युवी की बुमराह? जसप्रीत बुमराहने केला नवा विश्वविक्रम

पी व्ही सिंधू सध्या मलेशिया ओपन 2022 मध्ये भाग घेत आहे, असे असले तरी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 1 तासाच्या आत हजारो लोकांनी लाइक्स केले आहे. यावरुन हा डान्स तिच्या चाहत्यांना आवडला आहे. असेच म्हणावे लागेल.

शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पीव्ही सिंधू सोशल मीडियावर 'हेड, शोल्डर्स, नीड्स अँड टोज' या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या डान्समध्ये पीव्ही सिंधूची मस्ती आणि हसणे लोकांना वेड लावत आहे. तिच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर तिने काळ्या रंगाचे जेगिंग घातले आहे. तसेच, तो प्रिंटेड क्रॉप टॉप आणि प्रिंट केलेला सैल उघडा शर्ट सोबत नेला आहे.

p v sindhu
कंगनाने राकुल प्रीतबद्दल केले मोठे वक्तव्य, म्हणाली- सद्गुरू तुझ्या खेळाबद्दल...

हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की, 'तुम्हाला जे खूश करते ते करा'. पीव्ही सिंधूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याचवेळी चाहते यावर अनेक कमेंट करत आहेत, एका यूजरने लिहिले 'ब्युटीफुल डान्स पीवी', तर दुसऱ्या यूजरने लिहिले की 'तुम्ही जे काही करता ते आम्हाला आवडते. त्यामूळे सिंधुने या गाण्यावरील स्टेपने आपल्या चाहत्यांच्या मनातील स्थान आणखी घट्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com