हा युवी की बुमराह? जसप्रीत बुमराहने केला नवा विश्वविक्रम

एजबॅस्टनमध्ये भारत विरुध्द इंग्लंड यांच्यातील 5व्या सामन्यात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने नवा विश्वविक्रम केला आहे.
Jaspreet Bumrah
Jaspreet BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

Jasprit Bumrah Vs Stuart Broad: एजबॅस्टनमध्ये भारत विरुध्द इंग्लंड यांच्यातील 5व्या सामन्यात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने नवा विश्वविक्रम केला आहे. बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा काढल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले आहे. भारतीय कर्णधाराची ही झंझावाती खेळी पाहिल्यानंतर क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला युवराज सिंगचे 6 षटकार आठवले. युवीने 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कपमध्ये ब्रॉडविरुद्ध 6 षटकार मारले होते. जसप्रीत बुमराहने 16 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 31 धावांची खेळी केल्याने भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या. (jasprit bumrah vs stuart broad ind vs eng 2nd test most expensive over in test history sachin tendulkar yuvraj singh)

दरम्यान, बुमराहने तुफानी खेळी केल्यानंतर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ट्विट करत म्हटले की, 'हा युवी आहे की बुमराह!? 2007 ची आठवण करुन दिली..'

याशिवाय बुमराहची झंझावाती खेळी पाहून इतर क्रिकेटर्सही थक्क झाले.

दुसरीकडे, स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास टीम इंडियाने (Team India) पहिल्या दिवशी 7 विकेट गमावून 338 धावा केल्या होत्या. दुस-या दिवशी जडेजाने शतक झळकावून संघाला 400 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने (India) दुसऱ्या दिवशी एकूण 78 धावांची आघाडी घेतली. याआधी भारतासाठी पंतने 146 धावांची तुफानी खेळी खेळताना कसोटी कारकिर्दीतील 5 वे शतक झळकावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com