चित्रपटात अंडी खाल्ल्यामुळे या कलाकाराला त्याच्याच जातीने केलं होतं बहिष्कृत मग आमिर खान आला आणि...

पिपली लाईव्ह फेम अभिनेता ओंकार दास माणिकपूरीचे आयुष्य म्हणजे केवळ संघर्ष आणि संघर्ष आहे.
Onkar das Manikpuri struggle
Onkar das Manikpuri struggleDainik Gomantak
Published on
Updated on

Onkar das Manikpuri struggle : आमिर खानचा पीपली लाईव्ह हा चित्रपट आठवतो? त्यातला मुख्य अभिनेता म्हणजेच ओंकार दास माणिकपूरी याची गोष्ट आज पाहुया.

जेव्हा ओंकार दास माणिकपुरी यांनी आमिर खानच्या 'पीपली लाइव्ह' या चित्रपटातून पदार्पण केले तेव्हा तो भारतीय चित्रपटसृष्टीचा 'कोहिनूर' म्हणून उदयास येईल असे कोणालाही वाटले नव्हते. या चित्रपटातील माणिकपुरी नाथाच्या भूमिकेत ओंकार दासने भुरळ घातली होती.

जवानमध्ये सर्वांना रडवले

आता तोच 'नाथा' म्हणजेच ओंकार दास जेव्हा शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये दिसला तेव्हा त्याने सगळ्यांना रडवले. या चित्रपटात तो आत्महत्या करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. 

ओंकार दास माणिकपुरी या व्यक्तिरेखेने 'जवान' कथेत खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण ज्या प्रकारची गरिबी आणि दु:ख ओंकार दासने 'जवान'मध्ये साकारले होते, त्याचा सामना त्याने वैयक्तिक आयुष्यातही केला आहे.

अनेक महिने साधा चहासुद्धा नव्हता

ओंकार दास माणिकपूरींची कहाणी लाखो लोकांसाठी प्रेरणादायी असेल. ओंकार दासने खऱ्या आयुष्यात पाहिलेला प्रसंग आणि त्याला आलेल्या अडचणी क्वचितच कोणी सहन करू शकतील. जरा कल्पना करा की तुम्ही इतके भयंकर संकटात असाल की तुम्ही अनेक महिने चहा देखील पिऊ शकत नाही. 

नातेवाईकांनी तोंड फिरवले

ओंकार दासची परिस्थिती पाहुन नातेवाईकांनीही घरी येणे बंद केले . महिनोंमहिने रेशन व अन्नासाठी भटकावं लागलं. हे सगळं सहन करशील का? नाही, पण ओंकार दासने हे सर्व सहन करून आपली हिंमत अबाधित ठेवली. आज तो बॉलिवूडमध्ये नाव कमावतो आहे. अलीकडेच तो अक्षय कुमारच्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटातही दिसला होता.

'पीपली लाइव्ह'मधून

ओंकार दास माणिकपुरी यांनी 2010 मध्ये 'पीपली लाइव्ह' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याआधी ते त्यांच्या गावातील ‘नाचा’ या लोकनाट्यात काम करायचे. यामध्ये पुरुष आणि मुले महिलांचे कपडे घालून नाचत असत. 

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई या छोट्याशा गावात जन्मलेल्या ओंकार दासने खूप गरिबी आणि आर्थिक संकट पाहिले. 'पीपली लाइव्ह'पूर्वी त्यांचे आयुष्य असे होते की ते पाहून कोणताही आत्मा हादरेल.

पाचवीपर्यंतच शिक्षण

ओंकार दासने 2022 मध्ये 'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या संघर्षाची दुःखद कहाणी सांगितली होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला पाचवीपर्यंतच शिक्षण घेता आले, असे ओंकारने सांगितले. 

परिस्थिती अशी होती की एकदा चहा प्यायला तर महिनोंमहिने तो पुन्हा प्यायला मिळत नाही. चहा प्यायलाही पैसे नव्हते. रेशन घेण्यासाठीही पैसे नव्हते. ओंकार दासने सांगितले होते की, अनेक वेळा तांदूळ संपतो तर कधी महिनाभर भाजी मिळत नाही.

Onkar das Manikpuri struggle
Onkar das Manikpuri struggleDainik Gomantak

पीपली लाईव्ह

पण जेव्हा 'पीपली लाइव्ह' हा चित्रपट आला तेव्हा ओंकार दासचे आयुष्यच बदलून गेले. पूर्वी ते आपल्या मुलांना योग्य शाळेत पाठवू शकत नव्हते किंवा त्यांना जेवणही मिळत नव्हते. पण आता कुटुंबाची परिस्थिती चांगली आहे. पण ज्या चित्रपटाने ओंकार दासचे आयुष्य सुधारले, त्यामुळे त्याला अपमानित व्हावे लागले. 

जातीनेच केले बहिष्कृत

अभिनेत्याने सांगितले होते की, तो माणिकपुरी जातीचा असल्याने तो मांसाहार करत नाही, पण 'पीपली लाइव्ह'च्या एका सीनमध्ये अंडी खाल्ल्यामुळे त्याच्याच जातीतील लोकांनी त्याचा खूप अपमान केला होता. ओंकार दासला बिरादरीतून बाहेर काढण्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली होती. ओंकारदास माणिकपुरी यांनी सांगितले होते की, त्या घटनेमुळे आजही ते त्यांच्या सोसायटीच्या बाहेर आहेत.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com