Priyanka And Virat In Man Vs Wild
Priyanka And Virat In Man Vs WildDainik Gomantak

Priyanka And Virat In Man Vs Wild : बेअर ग्रिल्ससोबत आता प्रियांका अन् विराट करणार जंगल सफर

मॅन वर्सेस वाईल्ड या प्रसिद्ध शोमध्ये आता विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा दिसणार आहेत
Published on

बेअर ग्रिल्स आणि त्याची डोंगर दऱ्यातली भटकंती कोण विसरेल? जगभरातल्या पर्यावरणप्रेमी प्रेक्षकांचं मनोरंजन बेअर ग्रील्स आणि त्याच्या शोने केलं आहे. मॅन vs वाईल्ड हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. गेली अनेक वर्ष मॅन vs वाईल्ड या शोने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मॅन vs वाईल्डमधुन बेअरने अनेक सेलिब्रिटींसोबत जंगलाची सफर केली.

बेअर ग्रिल्सने जंगलाजंगलात, डोंगरदऱ्यांमध्ये, काट्याकुट्यांमधून फिरत अनेक ठिकाणी भटकंती केली आहे. गेल आतापर्यंत या शोमध्ये रजनीकांत, अक्षय कुमार, रणवीर सिंग अनेक इंडियन सेलिब्रिटी आले आहेत.

बेअरसोबत आता प्रियांका अन् विराट

आता या शोमध्ये प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली हे प्रसिद्ध इंडियन सेलिब्रिटी झळकणार असल्याची चर्चा आहे.

याविषयी बियर ग्रिल्स म्हणतो.. “मी फिंगर क्रॉस करतोय, जर असे घडत असेल तर मज्जा येणार. आम्ही सध्या याविषयी प्लांनिंगवर काम करत आहोत. आम्ही अद्याप कशावरही शिक्कमोर्तब केलानाही, परंतु गोष्टी योग्य दिशेने जात आहेत. ”

प्रियांका, विराट किस्से सांगणार

४८ वर्षीय बेअर ग्रिल्स पुढे सांगतो, “पुढच्या एपिसोडमध्ये विराट कोहलीसोबत प्रियांका असण्याची शक्यता आहे. हे दोघेही असेच प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत.

या दोघांना जगभरात लोकप्रियता मिळते. त्यामुळे, या दोघांच्या आयुष्यात घडलेले किस्से ऐकणे, त्यांचा प्रवास आणि त्यांचे आयुष्य जाणून घेणे हा माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा एक पर्वणी असेल.” पुढील काही महिन्यांत प्रियंका आणि विराट यांच्यासोबतच्या खास भागाचं शूटिंग करण्याचा प्लॅन आहे.

Priyanka And Virat In Man Vs Wild
Arjun Rampal : लग्नाआधी अर्जून रामपाल बनणार दुसऱ्यांदा बाबा..गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केलेले फोटो पाहाच

गेल्या वर्षी बेअर भारतात

गेल्या काही वर्षांमध्ये, मॅन व्हर्सेस वाइल्ड या त्याच्या शोमधून पहिल्यांदा लोकप्रियता मिळवलेल्या ग्रिल्सने भारतात अनेक भेटी दिल्या,

ज्यात कोलकाता आणि दार्जिलिंगमधील गेटवेचा समावेश आहे. आता मॅन vs वाईल्ड प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली हा स्पेशल भाग काय रंगत आणणार याची सर्वांना उत्सुकता आहे. प्रियंका अलीकडेच सिटाडेल या वेबसिरीजमध्ये झळकली. तर विराट सध्या WTC मध्ये व्यस्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com