Daljit Kaur Death: प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे निधन; पंजाबीसह, हिंदी सिनेसृष्टीही हळहळली

दलजीत अभिनयासह हॉकी आणि कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू देखील होत्या.
Daljit Kaur Death
Daljit Kaur DeathDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाबी चित्रपटांसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या दलजीत कौर (69) यांचे निधन झाले आहे. मागील बऱ्याच काळापासून आजारी असणाऱ्या कौर यांनी लुधियाना येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दलजीत यांनी पंजाबीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. कौर यांच्या निधनाने पंजाबीसह हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

Daljit Kaur Death
Nushrratt Bharuccha: नुसरतचा साडीतला बोल्ड लूक

अभिनेत्री दलजीत कौर यांनी 70 पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, 10 हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केली आहे. 1976 साली प्रदर्शित झालेल्या 'दाज' या चित्रपटापासून दिलजीत यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. पुत जट्टन दे, मारमन गुला है, की बानू दुनिया दा, सरपंच आणि पटोला या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. पतीच्या निधनानंतर दलजीत कौरने चित्रपटात काम करणे बंद केले होते.

Daljit Kaur Death
Sunny Leone's Bold Photoshoot: सनीचा वाईल्ड पोशाखातील घायाळ करणारा बोल्ड फोटोशूट

दलजीत कौर यांनी 2001 मध्ये पुन्हा दुसरी इनिंग सुरू केली आणि अनेक चित्रपटांमध्ये आई आणि वृद्ध महिलेची भूमिका साकारली. गिप्पी ग्रेवालचा सिंग व्हर्सेस कौर हा चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी गिप्पी ग्रेवालच्या आईची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री दलजीत कौर यांचा जन्म 1953 मध्ये सिलीगुडी येथे झाला. दलजीत अभिनयासह हॉकी आणि कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू देखील होत्या. दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com