Nilu Kohli Husband Dies : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये सापडले शव...

अभिनेत्री निलू कोहलीच्या पतीचे निधन झाले असुन त्यांचे शव बाथरूममध्य सापडल्याची बातमी समोर आली आहे.
Nilu Kohli Husband Dies
Nilu Kohli Husband Dies Dainik Gomantak

अभिनेत्री श्रीदेवी यांचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनेने मनोरंजन विश्व हादरुन गेले होते, अशीच एक घटना पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातून समोर आली आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहलीचे पती हरमिंदर सिंग कोहली यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले.

 हरमिंदर सिंग यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर हरमिंदर सिंग यांचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला होता. ही बातमी समोर येताच सगळीकडून शोक व्यक्त केला जात आहे.

अभिनेत्री नीलू कोहलीचा पती हरमिंदर सिंग कोहली पूर्णपणे तंदुरूस्त होते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर गेल्या शुक्रवारी त्यांनी गुरुद्वारालाही भेट दिली होती. तेथून परतल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले आणि बराच वेळ बाहेर आले नाहीत. 

यानंतर घरात उपस्थित असलेल्या एका मदतनीसाने त्यांचा शोध घेतला असता ते बाथरूममध्ये पडलेले आढळून आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हरमिंदर सिंग यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Nilu Kohli Husband Dies
Mahira Khan: "माहिरा खानला मानसिक समस्या आहे ती शाहरुख खानसाठी वेडी झालीय" पाकिस्तानी सिनेटर असं का म्हणाला?

मिळालेल्या माहितीनुसार, नीलूची जिवलग मैत्रीण वंदना अरोरा हिने अभिनेत्रीच्या पतीच्या मृत्यूची बातमीची खात्री दिली आहे. वंदनाने सांगितले की, त्यावेळी मदतनीस घरात उपस्थित होता आणि तो हरमिंदर सिंग कोहलीसाठी दुपारचे जेवण करत होते. मदतनीस त्यांना दुपारचे जेवण देण्यासाठी हरमिंदर बाथरूममधून परत येण्याची वाट पाहत होता. 

त्याचवेळी बराच वेळ होऊनही हरमिंदर बाथरूममधून बाहेर न आल्याने त्या हेल्परने बाथरुममध्ये जाऊन तपासणी केली असता, हरमिंदर तिथेच पडून होते. वंदनाने असेही सांगितले की, हरमिंदर हे मधुमेहाने पिडीत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com