Priyanka Chopra- Nick Jonas : जेव्हा 7 वर्षांच्या निक जोनासने प्रियांका चोप्राला मिस वर्ल्ड बनताना पाहिले होते...

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची पहिली भेट ही निक 7 वर्षांचा असताना झाली होती.
Priyanka Chopra- Nick Jonas
Priyanka Chopra- Nick JonasDainik Gomantak

अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकताच एक गंमतीशीर खुलासा केला आहे. तिने सांगितले की तिचा पती, निक जोनास याने जेव्हा 23 वर्षांपूर्वी तिला पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हा वयाच्या 18 व्या वर्षी तिला मिस वर्ल्डचा ताज मिळाला होता. आणि त्यावर्षी निक जोनास फक्त 7 वर्षांचा होता.

द जेनिफर हडसन शोमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमादरम्यान, प्रियांकाने ही गोष्ट शेअर केली . प्रियांकाच्या सासुबाईंनीही प्रियंकाला लंडनमध्ये 2000 साली मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकताना पाहिले होते. जिथे प्रियांकाने ही प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.

प्रियांकाला हे माहीत नव्हते की, अवघ्या सात वर्षांचा तरुण निक जोनास टेक्सासमध्ये हजारो मैल दूरवरून हा शो पाहत होता. प्रियांकाच्या सासूबाईंनी नंतर मिस वर्ल्ड इव्हेंटची आठवण करून दिली आणि शेअर केले की प्रियांकाचे सासरे केविन सीनियर यांना अशा स्पर्धा पाहणे आवडते, ते प्रियांकाच्या सौंदर्याने मोहित झाले होते. योगायोगाने, सात वर्षांचा निक वडिलांच्या शेजारी बसला आणि प्रियांकाला मिस वर्ल्डचा ताज जिंकताना त्याने पाहिले.

जोनास कुटुंब त्यावेळी टेक्सासमध्ये राहत असल्याने प्रियांका सुरुवातीला संशयी होती. पण तिच्या सासूने आवर्जून सांगितले की निकने ही स्पर्धा पाहिली होती आणि तिला जिंकताना पाहिले होते. त्यावेळी, निक फक्त सात वर्षांचा होता आणि ब्रॉडवेवर आधीच एक कलाकार होता. प्रियांकाने आठवण सांगितली, "जेव्हा माझ्या सासूने मला ती गोष्ट सांगितली, तेव्हा मला आश्चर्य वाटले ही गोष्ट मला माहित नाही...' असेच मी सांगितले.

Priyanka Chopra- Nick Jonas
Twinkle Khanna : अभिनेत्री बनण्याआधी ती मासे आणि झिंगे विकायची, लोक म्हणायचे तू...

मी नुकतीच 18 वर्षांची असताना मी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा लंडनमध्ये होती. नोव्हेंबर महिना होता आणि मी जुलैमध्ये 18 वर्षांचा झाले मी तेव्हा लहानच होते, आणि मी काय करत आहे किंवा या जगात काय चाललं आहे? याची मला कल्पना नव्हती, मला फारसा सरावही नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com