Nawazuddin Siddiqui : "जे लोक रद्दी, बकरी विकतात तेच तुला नरकात घेऊन जातील" नवाजुद्दीन सिद्दीकीवर भाऊ का भडकला?

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता त्याच्या भावाच्या एका प्रतिक्रियेमुुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे
Nawazuddin Siddiqui
Nawazuddin Siddiqui Dainik Gomantak
Published on
Updated on

गेले काही दिवस अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी घरातल्या कायदेशीर वादामुळे चांगलाच चर्चेत आहे. पत्नी आणि आईशी झालेल्या वादानंतर नवाज बातम्यांमध्ये आला. यानंतर नवाजच्या पत्नीने एक व्हिडीओ व्हायरल केला सोबत त्याच्या मोलकरणीने दुबईत तीला एकटं सोडल्याचा आरोप केला होता.

तिच्या घरच्यांनी दुबईतून व्हिडिओ बनवून गंभीर आरोप केले होते, परंतु नंतर तिने आपले आरोप मागे घेतले आणि नवाजला क्लीन चिटही दिली. आता नवाजचा भाऊ शमास याने यावर प्रतिक्रिया देत भावावर टीका केली आहे. त्याने मोलकरीण सपनाच्या बदलेल्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यासाठी नवाजला जबाबदार धरले आहे. ट्विटरवर यावर जोरदार चर्चा सुरूय, नवाजच्या भावाने नवाजला चांगलेच बोल सुनावले आहेत चला पाहुया नवाजचा भाऊ नेमकं काय म्हणाला?

नवाजच्या पत्नीचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी 19 फेब्रुवारीला एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी भारत-दुबई दूतावासाला टॅग केले. यासोबतच कामगार मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्यतिरिक्त परराष्ट्रमंत्र्यांनाही टॅग केले होते. यामध्ये तिने सपनाचा एक व्हिडीओ शूट केला आहे, ज्यामध्ये ती रडत रडत तिचा त्रास सांगत आहे. एक पत्रही जोडले. 

यामध्ये सपना रॉबिनने आरोप केला आहे की, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने तिला दुबईत एकटे सोडले आहे, जिथे खाण्यापिण्याची सोय नाही. त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी एक पैसाही नाही. सपनाने व्हिडिओमध्ये आपला पगार देण्यास सांगितले होते आणि भारतात परत येण्याची विनंती केली होती.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी याने हाऊसहेल्पच्या माफीची बातमी ट्विट केली आणि लिहिले- 'हे स्क्रिप्टेड आहे. तुम्ही किती खरेदी कराल? बँक बॅलन्स संपू नये - तुमचे कामही गडबडले आहे आणि चित्रपटसृष्टीचे 150 कोटी रुपये रखडलेल्या चित्रपटांमुळे अडकले आहेत.  - जे लोक रद्दी, डाले आणि बकरे विकतात तेच त्याला नरकात घेऊन जातील.' 

मात्र, यावर नवाजकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण आता त्यांच्या बोलण्यातून अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत,यावर नवाज कधी न कधी बोलेलच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com