Naaz Joshi: वयाच्या 10 व्या वर्षी गँगरेप, रस्त्यावर मागायची भीक; मग इंटरनॅशनल ब्युटी क्वीनला...

Transgender International Beauty Queen: यशापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कधीच सोपा नसतो. आज आपण अशीच एक संघर्षमय कहाणी जाणून घेणार आहोत.
Naaz Joshi
Naaz JoshiDainik Gomantak
Published on
Updated on

Transgender International Beauty Queen: यशापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कधीच सोपा नसतो. आज आपण अशीच एक संघर्षमय कहाणी जाणून घेणार आहोत. जेव्हा वयाच्या दहाव्या वर्षी सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या आणि रस्त्यावर भीक मागून जगणाऱ्या एका मुलीने जगभरात आपला ठसा उमटवला. ही मुलगी नंतर भारताची पहिली ट्रान्सजेंडर आंतरराष्ट्रीय ब्युटी क्वीन बनली.

पहिली ट्रान्सजेंडर आंतरराष्ट्रीय सौंदर्य राणी

खरे तर, आम्ही इम्प्रेस अर्थ 2021-22 चे विजेतेपद जिंकणारी भारताची पहिली ट्रान्सजेंडर इंटरनॅशनल ब्युटी क्वीन नाज जोशीबद्दल बोलत आहोत. नुकतीच नाज जोशीची (Naaz Joshi) कहाणी सोशल मीडियावर (Social Media) पुन्हा व्हायरल झाली, त्यामुळे लोकांना तिच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. वास्तविक, नाज जोशीची कहाणी कोणालाही प्रेरणा देऊ शकते.

Naaz Joshi
Gauahar Khan in Goa: गौहरकडून गुड न्यूज, गोव्यातून शेअर केले खास फोटो

कुटुंबियांनी घरातून हाकलून दिले, सामूहिक बलात्कार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाज जोशीचा जन्म दिल्लीत झाला. नाज शरीराने मुलगा होता पण तिचे हावभाव आणि वागणूक मुलींसारखी होती. नाज ट्रान्सजेंडर असल्याचे कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी नाजला त्याच्या मामाकडे पाठवले. येथूनच नाजचा संघर्ष सुरु झाला. वयाच्या दहाव्या वर्षी, नाजच्या मामाने मद्यधुंद मित्रांसह नाजवर सामूहिक बलात्कार केला.

भीक मागणे, मसाज पार्लरमध्ये काम करणे

यानंतर जेव्हा नाज हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा ट्रान्सजेंडर समाजातील एका व्यक्तीने त्याची मदत केली आणि त्याला सोबत नेले. यानंतर नाजने अनेक ठिकाणी काम केले, रस्त्यावर भीक मागितली. बारमध्ये काम केले, मसाज पार्लरमध्ये काम केले. पण या सगळ्यासोबतच त्याने आपला अभ्यास सुरु ठेवला आणि काही काळानंतर त्याने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला.

Naaz Joshi
Pathaan Advance Booking: परदेशात 'पठाण'चे अ‍ॅडव्हान्स बुकींग जोरात सुरू,ओपनिंग शो हाऊसफुल..

ऑपरेशनद्वारे लिंग बदलले

अखेरीस, नाजने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली आणि 2013 मध्ये लिंग बदलाचे ऑपरेशन केले. त्यानंतर त्याचे मॉडेलिंग करिअर सुरु केले. त्यानंतर तो एका फोटोग्राफरला भेटला आणि त्याला एका ट्रान्सजेंडर सेक्स वर्करचा फोटो शूट करायचा होता. नाज त्याच्यासाठी परफेक्ट होता. नाजने दिल्लीच्या (Delhi) रस्त्यावर मुलींसारखे कपडे घालून बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटनंतर तो एका मॅगझिनच्या कव्हरवर झळकला.

8 सौंदर्य स्पर्धांचा किताब जिंकला

यानंतर नाजने मागे वळून पाहिलेच नाही. नाज जोशी भारताची पहिली आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर ब्युटी क्वीन बनली. नाजने सलग 3 वेळा मिस वर्ल्ड डायव्हर्सिटी ब्युटी पेजंटचा किताब जिंकला. इतकेच नाही तर नाजने 8 सौंदर्य स्पर्धांचा किताब जिंकला आहे. ती भारताची (India) पहिली ट्रान्सजेंडर इंटरनॅशनल ब्युटी क्वीन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com