Oscar Award 2023: RRR ने घडवला इतिहास, 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला ऑस्कर पुरस्कार

RRR ने घडवला इतिहास, 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला ऑक्सर पुरस्कार
Natu Natu 
RRR
Natu Natu RRRDainik Gomantak
Published on
Updated on

Oscar Award 2023: तेलगू चित्रपट RRR मधील 'नाटू नाटू' या गाण्याने 95व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'ओरिजिनल सॉन्ग' प्रकारात ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशाला अभिमान वाटण्याची संधी मिळाली आहे. 

आरआरआर (RRR) या चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली आणि त्यांची पत्नी उपासना कामिनेनीसह ज्युनिअर एनटीआर आणि आणि राम चरण गोल्डन ग्लोब्समध्ये प्रतिनिधित्व केले.

या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी 1920 च्या ब्रिटिश राजवटीतील भारताचे स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या.

या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटिश कलाकार रे स्टीव्हनसन, अॅलिसन डूडी आणि ऑलिव्हिया मॉरिस यांचा समावेश होता. 

Natu Natu 
RRR
Oscars 2023: अभिमानास्पद! भारताच्या 'The Elephant Whisperers'ने पटकावला ऑस्कर पुरस्कार

तर दुसरीकडे ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत भारताच्या The Elephant Whisperers  या माहितीपटानं ऑस्कर पटकावला आहे. सर्वाचा सोशल मिडियाच्या माध्यमातुन शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.

'द एलिफंट व्हिस्परर्स'ची कहाणी अतिशय असामान्य असून, यामध्ये मनुष्य आणि प्राणी यांच्यातील नातं हळुवारपणे उलगडून सांगण्यात आले आहे. एक दाक्षिणात्य जोडपं अनाथ हत्ती ची जबाबदारी घेतं आणि त्याला वाचवण्यासाठी जी मेहनत करतं यावर माहितीपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

कार्तिकी गोंसालवीसच्या दिग्दर्शनाका साकारलेल्या या माहितीपटाची निर्मिती सिख्या एंटरटेनमेंटनं केली आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com