Oscars 2023: अभिमानास्पद! भारताच्या 'The Elephant Whisperers'ने पटकावला ऑस्कर पुरस्कार

भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स'ने ऑस्कर 2023'मध्ये सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.
The Elephant Whisperers
The Elephant WhisperersDainik Gomantak

Oscars 2023: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'ऑस्कर.' जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात.

'ऑस्कर 2023'मध्ये भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटाने बाजी मारली आहे. या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार आपल्या नावे नोंदवला आहे.

'द एलिफंट व्हिस्परर्स' हा नेटफ्लिक्सवरचा एक माहितीपट आहे. या माहितीपटाला 'ऑस्कर 2023'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री  शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले होते.

या माहितीपटात तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील एका कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तामिळनाडूतील एक कुटुंब बेबंद हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं यावर बेतलेला हा माहितीपट आहे. 

The Elephant Whisperers
Deepika in Oscar 2023 : बेशरम गर्ल दिसणार आता 'ऑस्कर'च्या स्टेजवर...

गुनीत मोगाने द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers) या माहितीपटाची निर्मिती केली असून कार्तिकी गोन्साल्विसने या माहितीपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटासह 'हॉलआउट', 'हाउ डू यू मेजर अ इअर', 'द मार्था मिचेल इफेक्ट', 'स्ट्रेंजर ॲट द गेट' या माहितीपटांनादेखील 'ऑस्कर 2023'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री  शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं.

The Elephant Whisperers
Oscar 2023: भारताला दोन ऑस्कर मिळाल्यावर PM मोदींचे ट्विट चर्चेत; म्हणाले...

'द एलिफंट व्हिस्परर्स' या भारताच्या (India) माहितीपटाला ऑस्कर 2023'साठी नामांकन मिळाल्यानंतर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने या माहितीपटाचं कौतुक करत सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे.

तिने लिहिलं होतं,"मी नुकताच एक हृदयस्पर्शी माहितीपट पाहिला. हा माहितीपट मला खूप आवडला आहे. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांचे खूप खूप अभिनंदन"

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com