बॉलिवूडचा डिस्को डान्सर मिथुनदा होता नक्षलवादी

मिथुनदावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Mithun Chakraborty
Mithun ChakrabortyDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमध्ये इन्ट्रीपूर्वी स्ट्रगल अनेक अभिनेत्यांना करावा लागला. यापैकी एक नाव म्हणजे बॉलिवूडचा डिस्को डान्सर म्हणून ओळखला जाणारा मिथुनदा अर्थात मिथुन चक्रवर्ती. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अभिनय शिकला आणि या नंतर ते कामाच्या शोधात मुंबईत आले. यावेळी अनेक महिने काम न मिळाल्याने त्यांना दोन वेळची भाकरी मिळीली नाही. यामूळे त्यांनी अनेक दिवस उपाशी पोटी रात्र काढावी लागली होती. ( Mithun Chakraborty, a Bollywood disco dancer, was a Naxalite )

बॉलिवूडचा डिस्को डान्सर आज 72 वर्षांचा झाला आहे. यानिमित्ताने चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. त्यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकाता येथे झाला. मिथुनला जन्मावेळी गौरांग हे नाव देण्यात आले होते, मात्र चित्रपटात प्रवेश करताच त्याने हे नाव बदलले. मिथुनने रसायनशास्त्रात ग्रॅज्युएशन केले. ग्रॅज्युएशननंतर मिथुन कट्टर नक्षलवादी बनला. मात्र घरच्या गरिबीने त्यांने नक्षल चळवळ सोडून घराकडे मोर्चा वळवावा लागला. या चळवळीत सहभागी असताना कुख्यात नक्षलवादी रवी रंजनशी त्याची घट्ट मैत्री झाली होती.

जवळपास 350 उत्कृष्ट चित्रपट मिथुनदाने दिले

मिथुनने 1976 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट मृगया या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 350 उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत जवळपास 17 चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारल्या आहेत, जो हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंतचा एक विक्रम आहे.

भारताबद्दल बोलायचे झाले तर हा विक्रम मल्याळम अभिनेता प्रेम नजीरच्या नावावर आहे, ज्याने 40 चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त मिथुनची प्रॉपर्टीच्या व्यवसायातही मजबूत पकड आहे. म्हैसूर, मसिनागुडी यांसारख्या देशातील अनेक सुंदर ठिकाणी त्यांचे बंगले, हॉटेल्स, कॉटेज आणि आलिशान घरे आहेत.

Mithun Chakraborty
हार्ट अरिथमियाच्या समस्येमुळे दीपिका रुग्णालयात, नेमकी काय असतात 'या' आजाराची लक्षणं

मिथुनच्या चित्रपट कारकिर्दीतील चढउतार

अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मिथुनदाला हेलनचा सहाय्यक बनण्याची संधी मिळाली होती. तसेच अमिताभ बच्चन यांच्या 'दो अंजाने में' या चित्रपटात मिथुनला छोटी भूमिका मिळाली. यादरम्यान मिथुनला बॉडी डबल करून चित्रपटांमध्येही घेतले गेले.मिथुन मृणाल सेनच्या मृगया या चित्रपटात दिसला. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

कारकिर्दीतील सुवर्ण काळ

मिथुनच्या चित्रपट कारकिर्दीतील सुवर्ण काळ म्हणजे 1982 चा डिस्को डान्सर चित्रपट. या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली. असे करणारा हा पहिला हिंदी चित्रपट होता. जेव्हा त्याने चित्रपटाच्या गरजेनुसार डान्स केला, तेंव्हा त्याच्या स्टेप्स देशभर प्रसिद्ध झाल्या होत्या.

Mithun Chakraborty
Imtiaz Ali: इम्तियाज अलींचे खास 5 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

काही लक्षात राहणारे चित्रपट

कमांडो (1988)

प्यार झुकता नहीं (1985)

गुलामी (1985)

मला न्याय पाहिजे (1983)

घर एक मंदिर (1984)

ब्यूटीफुल फ्रॉम हेवन (1986)

प्यार का मंदिर (1988)

1989 मध्ये मिथुनचे एकाच वेळी 19 चित्रपट प्रदर्शित झाले, तर यानंतर 1993 ते 1998 या काळात मिथुनचे जवळपास 33 चित्रपट सतत फ्लॉप होत होते. मात्र त्यानंतर दिग्दर्शकांच्या विश्वासामुळे त्याला आणखी 12 चित्रपट मिळाले.

पहिले लग्न 4 महिन्यांत मोडले

मिथुन चक्रवर्ती यांनी हेलन ल्यूकशी १९७९ मध्ये लग्न केले. हे लग्न फक्त 4 महिने टिकले. मिथुनने या वर्षी आपल्या पहिल्या पत्नीला सोडल्याबरोबर योगिता बालीशी लग्न केले. त्यांना मिमोह, नमाशी, उष्मेह अशी तीन मुले आहेत. मिथुनने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या एका मुलीलाही दत्तक घेतले आहे, तिचे नाव त्याने दिशानी ठेवले आहे.

मिथुन आणि श्रीदेवी यांच्या अफेअरची चर्चा

मिथुन आणि श्रीदेवी यांच्या अफेअरची 1984 मध्ये आलेल्या 'जग उठा इंसान' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फिल्म कॉरिडॉरमध्ये खूप चर्चा झाली होती. दोघांची जवळीक इतकी वाढली की त्यांनी गुपचूप लग्नही केले. जेव्हा मिथुनने योगिता बालीला सोडण्यास नकार दिला तेव्हा श्रीदेवीने त्याच्यापासून फारकत घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com