Miss Universe 2023: दिविता राय करणार भारताचे प्रतिनिधीत्व, जाणून घ्या

Divita Rai: मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा यावेळी न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना, यूएसए येथे होणार आहे.
Divita Rai
Divita RaiDainik Gomantak
Published on
Updated on

Miss Universe 2023: मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा यावेळी न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना, यूएसए येथे होणार आहे. या सौंदर्य स्पर्धेत जगभरातून 86 महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत. भारताकडून दिविता राय देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस युनिव्हर्स हरनाज संधू विजेती स्पर्धकाला मुकुट घालेल. डिसेंबर 2021 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब हरनाझने जिंकला होता. या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन माजी मिस युनिव्हर्स ऑलिव्हिया कल्पो आणि जीनी माई जेनकिन्स करणार आहेत.

भारतात कधी आणि कधी बघायला मिळेल

मिस युनिव्हर्स 2023 शनिवार, 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. भारतीय वेळेनुसार 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता होईल. हा कार्यक्रम न्यू ऑर्लीन्स अर्नेस्ट एन मोरिअल कन्व्हेन्शनमधून प्रसारित केला जाईल. भारतात, हा कार्यक्रम अधिकृत फेसबुक पेज आणि JKN 18 चॅनलच्या YouTube चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय ते Voot वर ऑनलाइन स्ट्रीम केले जाईल.

Divita Rai
Miss Universe 2023: यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा कधी, कुठे अन् कशी पहायची; जाणून घ्या

कोण आहे दिविता राय

23 वर्षीय दिविता रायने मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब पटकावला. ती मिस युनिव्हर्स 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. दिविताचा जन्म कर्नाटकात (Karnataka) झाला. ती व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे. तिला चित्रकला, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि संगीत ऐकण्याची आवड आहे.

Divita Rai
Miss Universe 2021 Winner: 'हरनाजचा' मुकुट भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

लूक व्हायरल

मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या 'नॅशनल कॉस्च्युम राऊंड'मध्ये दिविताने सोनेरी पंखांनी बनवलेला लेहेंगा परिधान केला होता. त्याचा लूक व्हायरल झाला होता. सोन्याच्या पक्ष्याप्रमाणे परिधान केलेल्या वेशभूषेत दिविता देशाचे प्रतिनिधित्व करत होती.

भारताच्या दिविता राय हिचाही समावेश असेल

यावर्षी 23 वर्षीय दिविता राय मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती कोलकाता येथील रहिवासी आहे. दिविता राय ही व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे. तिच्या आवडींमध्ये बॅडमिंटन (Badminton), बास्केटबॉल, चित्रकला, संगीत ऐकणे आणि पुस्तके वाचणे यांचा समावेश आहे.

दिविताने यापूर्वी LIVA मिस दिवा युनिव्हर्स 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. माजी मिस युनिव्हर्स हरनाझ संधू यांच्या हस्ते तिला मुकुट घातला गेला. दिविताने मिस दिवा युनिव्हर्स स्पर्धा 2021 मध्येही भाग घेतला होता. जिथे, हरनाज संधू विजेता ठरली होती. गेल्या वर्षी या स्पर्धेत दिविताची सेकंड रनर अप म्हणून निवड झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com