Met Gala 2023 मध्ये मांजरीचा लुक करुन का गेले होते सेलिब्रिटी? वाचा एका क्लिकवर

मेट गाला या इव्हेंटसाठी अनेक सेलिब्रिटींनी कॅटसारखा लुक केला होता.
Met Gala 2023
Met Gala 2023 Dainik Gomantak
Published on
Updated on

Met Gala 2023: मेटा गाला हा इव्हेंट (२ मे) ला मोठ्या उत्साहात पार पडला आहे. मेट गाला 2023  या इव्हेंटला बॉलिवुड ते हॉलिवुड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये काही सेलिब्रिटींनी हटके लूक केला होता.

तर काही सेलिब्रिटींच्या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. मेट गाला 2023  या  इव्हेंटसाठी अनेक सेलिब्रिटींनी मांजरीचा लूक केला होता.  जाणून घेउया बद्दल अधिक माहिती.

यंदाच्या मेट गालाची थीम कार्ल लेजरफेल्ड यांच्यावर आधारित होती. दिवंगत फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्ड हे जगभरात खूप लोकप्रिय होते. त्यांच्या उत्कृष्ट डिझाइन्सचे लोकांनी कौतुक केले होत. 

कार्ल लेजरफेल्ड मांजरी देखील लोकप्रिय असुन त्या मांजरीचे नाव चौपेट आहे. चौपेट तिच्या जीवनशैलीसाठी खूप प्रसिद्ध आहे. चौपेट ही जगभरातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राण्यांपैकी एक आहे.

चौपेटकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट, डिझायनर कपडे  आहेत. लेगरफेल्ड हे एकदा म्हणाले होते की, चौपेटने जगाचं लक्ष केंद्रीत केलं आहे.

Met Gala 2023
Satyajit Ray Birth Anniversary : जेव्हा एक दिग्दर्शक चक्क इंदिरा गांधींच्या कामाला नकार देतो

चौपेटचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत. चौपेटचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट देखील आहे. या अकाऊंटला 190k फॉलोअर्स आहेत.

कार्ल लेजरफेल्ड यांना त्यांची  चौपेट ही मांजर खूप आवडत होती. 2019 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी कार्ल लेजरफेल्ड यांचा मृत्यू झाला. 

मेट गाला 2023 ची थीम कार्ल लेजरफेल्ड यांना समर्पित करण्यात आली. त्यामुळे या इव्हेंटला अनेक सेलेब्स चौपेटच्या लूकमध्ये पोहोचले. जेरेड लेटो, लिल नास एक्स आणि डोजा कॅट सारख्या  सेलिब्रिटींनी मांजरी सारखा लूक केला होता

जेना ऑर्टेगा,  किम कार्दशियन,  रोझे या सेलिब्रिटींनी देखील मेट गाला इव्हेंटमध्ये हजेरी लावली. तसेच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा  यांनी देखील मेट गाला या इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती.

मेट गाला इव्हेंटमधील सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com