बिपाशा बसूने मुलीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर केला शेअर चाहते म्हणाले...

अभिनेत्री बिपाशा फिल्म इंडस्ट्रीपासून सध्या दूर असली तरी ती सोशल मिडीयावर सक्रिय असते.
Bipasha Basu shares Video
Bipasha Basu shares VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Bipasha Basu shares Video : 'राज' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री बिपाशा बसू सध्या सोशल मिडीयावर एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. मुलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर करत बिपाशाने चाहत्यांना आपल्या मुलीच्या एका सवयीबद्दल सांगितले आहे.

इन्स्टावर स्टोरी केली शेअर

बिपाशा बसूची मुलगी देवी बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी नुकताच त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला.

दरम्यान, अभिनेत्री बिपाशाने इन्स्टा स्टोरीवर तिची मुलगी देवीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. आई आणि मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

Bipasha Basu shares Video
Bipasha Basu shares VideoDainik Gomantak

मुलीचा पहिला वाढदिवस

अलीकडेच या जोडप्याने मालदीवमध्ये देवीचा पहिला वाढदिवस साजरा केला. मालदीवमध्ये सुट्टी घालवून हे जोडपे मुंबईत परतले आहे. दरम्यान, अभिनेत्री बिपाशाने इन्स्टा स्टोरीवर देवीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

देवी स्टोरी बुक्स पाहुनच झोपते

बिपाशा बसू ने इंस्टाग्राम स्टोरीवर देवीचा एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये देवी तिच्या पुस्तकांसह दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशाने सांगितले आहे की, देवी झोपण्यापूर्वी तिची स्टोरी बुक्स पाहून झोपते.

देवी यांच्या कथा पुस्तकांच्या संग्रहात Roar, Roar Baby!, Dear Zoo, Hello या पुस्तकांचा समावेश आहे. मात्र, बिपाशाने व्हिडिओमध्ये तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नाही.

बाळाच्या हृदयाला होल

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी देवीचे आई-वडील झाले. लग्नाच्या 6 वर्षांनंतर हे जोडपे पालक बनले आहे.

तिच्या मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यांनंतर, अभिनेत्रीने नेहा धुपियाशी लाइव्ह चॅट दरम्यान खुलासा केला की तिने IVF द्वारे देवीला जन्म दिला होता, परंतु तिच्या जन्मानंतर तीन दिवसांनी तिच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्र असल्याचे आढळून आले.

तिसऱ्या महिन्यात तिचं ऑपरेशन करावं लागतं

याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, पहिले 40 दिवस आणि 40 रात्री आम्ही एक क्षणही झोपू शकलो नाही. एवढेच नाही तर बिपाशाने असेही सांगितले होते की, होलच्या आकारामुळे देवीला तीन महिन्यांत शस्त्रक्रिया करावी लागली.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com