Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: मामुटीला वाटलं समोर बाबासाहेब उभे आहेत..मेक-अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी सांगितलेला तो किस्सा..

मेक-अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी मल्याळम सुुपरस्टार मामुटी यांची एक आठवण सांगितली आहे.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.

जातीव्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेबांनी केलेला संघर्ष जगातल्या कित्येक चळवळींना प्रेरणादायक. आजच्या दिवशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.

आजवर साहित्याच्या सगळ्या प्रकारात कलाकारांनी बाबासाहेबांना वंदन केले आहे. कविता, पोवाडा, गाणी, कथा, चित्रपट आणि कादंबरी या द्वारे बाबासाहेबांचा संघर्ष मांडला गेला आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कित्येक चित्रपट आले आहेत.

पण सगळ्या चित्रपटांमध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट विशेष आहे. या चित्रपटात मल्याळम सुपरस्टार मामुटी यांनी साकारलेले बाबासाहेब इतके अप्रतिम आणि हुबेहुब होते की हा चित्रपट माईलस्टोन ठरला.

या चित्रपटाचे मेक-अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी एक किस्सा सांगितला होता. या चित्रपटात विक्रम गायकवाड मेक-अप करणार होते,त्यांनी मामुटी या अभिनेत्यासाठी फर्स्ट लूकची तयारी केली, तोपर्यंत मामुटी या चित्रपटासाठी फायनल झाले नव्हते. मामुटी केरळचे सुपरस्टार.

त्यांनी आजवर कुठल्याही भूमीकेसाठी आपल्या मिशा काढल्या नव्हत्या. आणि बाबासाहेबांच्या भूमीकेसाठी मिशा तर काढाव्या लागणारच होत्या. शेवटी खूप चर्चा झाल्यानंतर एक पर्याय काढण्यात आला. मामुटीसाठी खोट्या मिशा तयार करण्यात आल्या.

Dr. Babasaheb Ambedkar
Shah Rukh Khan: शाहरुख खानचं पश्तूनी पठाण परंपरेशी काय नातं आहे? पठाणांचा इतिहास काय?

या पर्यायानंतर अभिनेते मामुटी तयार झाले, विक्रम गायकवाड यांनी घराचे पडदे आणि दरवाजे बंद केले. काही तासांनी जेव्हा मेक -अप पूर्ण झाला तेव्हा समोरच्या आरशात मामूटी यांना त्यांचं नवं रूप दाखवण्यात आलं.

आपला नवा लूक बघताच मामूटी भारावून गेले,त्यांनी समोर तर बाबासाहेब उभे आहेत अशा भावना व्यक्त केल्या. हा किस्सा मेक - अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला होता. या चित्रपटात मामूटी यांच्या भूमीकेचं कौतुक करण्यात आलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com