दिलसे, महाराजा, अग्नीसाक्षी, युगपुरूष यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री मनिषा कोईरालाला एका एकाकी आयुष्य जगावं लागतंय. कधीकाळी तिचंही लग्न झालं होतं पण दुर्दैवाने तिला निराशेलाच सामोरं जावं लागलं.
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मनीषा कोईराला हिने बऱ्याच काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. आज ही अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. मनीषाच्या चित्रपटांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले, पण खऱ्या आयुष्यात मनीषाला नेहमीच एकटे राहावे लागले.
मनीषा कोईराला हिचा समावेश ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये होतो. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू भाषेतही चित्रपट केले आहेत.
साऊथच्या बॉम्बे, इंडियन आणि मुधलवण यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतेच एका मुलाखतीत मनीषाने लग्नानंतर झालेल्या त्रासाबद्दल सांगितले.
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मनीषा कोईराला हिने बऱ्याच काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. आज ही अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. मनीषाच्या चित्रपटांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले, पण खऱ्या आयुष्यात मनीषाला नेहमीच एकटे राहावे लागले.
विशेष म्हणजे मनीषाने नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहलसोबत लग्न केले, पण लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता बऱ्याच काळानंतर अभिनेत्रीने तिच्या लग्नाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
नुकत्याच झालेल्या मुलाखतीत याविषयी बोलताना मनीषा म्हणाली की, तिची फेसबुकच्या माध्यमातून सम्राटशी भेट झाली. दोघांनी एकमेकांना भेटायला सुरुवात केली आणि मग लग्न करण्याचा विचारही केला.
मनिषाने सांगितले की, लग्नाच्या सहा महिन्यांनंतर तिच्यामध्ये आणि सम्राटमध्ये वाद सुरू झाला. खूप प्रयत्न करूनही काही जमलं नाही म्हणून दोघांनी लग्नाच्या दोन वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
मनीषा पुढे म्हणाली, 'लग्नाबद्दल माझी अनेक स्वप्ने होती, जी कधीच पूर्ण झाली नाहीत. मात्र, यासाठी मी कोणाला दोष देत नाही, जो काही दोष होता तो फक्त माझाच होता. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसाल तर वेगळे होणे हा शेवटचा पर्याय उरतो.
लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच माझा नवरा माझा शत्रू झाला. पत्नी आणि स्त्रीसाठी यापेक्षा वाईट काय असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.