Akshay Kumar-Imran Hashmi : अक्षय कुमार पुन्हा एकदा 29 वर्षांनी आगामी 'सेल्फी'मध्ये 'मै खिलाडी तू अनाडी' वर थिरकणार...

अक्षय कुमार आणि इमरान हश्मी यांच्या मुख्य भूमीका असणारा सेल्फीचा टिजर रिलीज झाला असुन
Akshay Kumar
Imran Hashmi
Akshay Kumar Imran HashmiDainik Gomantak

29 वर्षांनंतर, तुमचा आवडता सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा खिलाडीवर आयकॉनिक ट्यूनवर नाचताना दिसणार आहे. सेल्फी चित्रपटातील मैं खिलाडी या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. या टिजरमध्ये आता 'मै खिलाडी तू अनाडी'चं गाणं वाजणार आहे

ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. 90 च्या दशकातील 'मैं खिलाडी तू अनाडी' या चित्रपटाच्या टायटल ट्रॅक हे सेल्फी चित्रपटातही वाजणार आहे.

सेल्फी चित्रपटातील 'मैं खिलाडी तू अनारी' या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. या आयकॉनिक गाण्यात अक्षय कुमार पुन्हा एकदा डान्स करताना दिसत आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत इमरान हाश्मी दिसत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटीही त्यांना साथ देताना दिसत आहेत. गाण्यात अक्षय आणि इमरान दोघांची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

मैं खिलाडी तू अनारी हे गाणे त्याच्या काळातील एक आयकॉनिक गाणे होते, जे रिलीजच्या वेळी प्रचंड गाजले. त्या गाण्यात अक्षयसोबत सैफ दिसला होता, मात्र सेल्फी चित्रपटातील या गाण्यात सैफची जागा इमरान हाश्मीने घेतली आहे..

 चाहत्यांना या गाण्यात सैफची उणीव भासत आहे, पण इमरान हाश्मी त्याची पोकळी भरून काढताना दिसत आहे. याच टीझरमध्ये अक्षय कुमार चमकदार हिरव्या ब्लेझरमध्ये तर इमरान हाश्मी चमकदार काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये सुंदर दिसत आहे. दोन्ही स्टार्स जबरदस्त डान्स करत आहेत

सेल्फी चित्रपटातील मैं खिलाडी हे गाणे 1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सेल्फी हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. यात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. आता 29 वर्षांनंतर 'मैं खिलाडी' चित्रपटातील गाणे रिक्रिएट झाले असताना हे गाणे तीच जुनी जादू पुन्हा जिवंत करू शकेल का, हे पाहावे लागेल.

Akshay Kumar
Imran Hashmi
Anurag Kashyap: "तो माझ्याकडे काम मागायला आला होता, मला पश्चात्ताप होतोय", अनुराग कश्यपने सुशांतच्या मृत्यूवर केलं मोठं विधान...

हे मूळ गाणे अभिजीत भट्टाचार्य, उदित नारायण आणि अनु मलिक यांनी गायले होते आणि जॉनी लीव्हर देखील फ्रेममध्ये होते. ज्यामध्ये शिल्पा शेट्टीने दुहेरी भूमिका केली होती तसेच या चित्रपटात रागेश्वरी देखील दिसली होती. हा चित्रपट त्या वर्षातील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

 राज मेहता दिग्दर्शित 'सेल्फी' या चित्रपटात अक्षय आणि इमरान पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'सेल्फी' चित्रपट ' हा मल्याळम ड्रायव्हिंग लायसन्स'चा रिमेक आहे. ज्यामध्ये पृथ्वीराज आणि सूरज वेंजारामूडू मुख्य भूमिकेत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com