Maharashtra Government: शिंदे -फडणवीस सरकारचा मोठा निर्णय..मनोरंजनासाठी नवीन नियमावली

मनोरंजनाच्या संदर्भात शिंदे - फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे
Maharashtra Government
Maharashtra Government Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही काळात मनोरंजन विश्व चांगलेच चर्चेत आहे. बॉयकॉट बॉलिवूडची मोहिम असो किंवा शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने उद्भवलेला वाद असो, चित्रपट आणि विशेषत: बॉलिवूडची नकारात्मक चर्चा खूप झाली आहे.

अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉलिवूडचे संपत चाललेले महत्त्व पुन्हा एकदा वाढवले बॉलिवूडपासुन दुरावलेला प्रेक्षक पुन्हा एकदा परत आणण्याचे श्रेय शाहरुखच्या पठानला जाते. आता मनोरंजन विश्व पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे शिंदे- फडणवीस सरकारचा नवा निर्णय. काय असणार आहे मनोरंजन विश्वासाठीची नवी नियमावली? चला पाहुया

नव्या निर्णयानुसार सरकारने बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकार, कामगार, निर्माते यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासगळ्यांसाठी एक नवी नियमावली लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय .

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे आता बॉलिवूडमधील कलाकारांवर आणि त्यांच्या मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी हे निर्णय घेतले गेल्याचं सांगितलं जातंय .

बॉलिवूडमध्ये समान वेतनाची समस्येवर एक महत्त्वचा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयानुसार आता प्रत्येक कलाकाराला समान वेतन देणं हे निर्मात्यांसाठी बंधनकारक असणार आहे. तर दुसऱ्या एका नियमानुसार मनोरंजनसृष्टीतील कामगारांना काम बंद करून निर्माते आणि दिग्दर्शकांना वेतनाबाबत जाबही विचारता येणार आहे.

याबरोबरच मनोरंजनक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नवं पोर्टलही तयार करण्यात येणार आहे.

Maharashtra Government
Piyush Mishra:"रणबीर कपूरची भाषा अत्यंत घाणेरडी" पियुष मिश्रा काय म्हणाले?

हे नवे नियम मालिका, जाहिराती, ओटीटीसाठीही असणार आहेत. शिवाय महिला कलाकार आणि कामगारांना घरपोच वाहतूक सुविधा पुरवायचेसुद्धा आदेश राज्यसरकारने दिले आहेत.

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात मनोरंजन क्षेत्रातल्या महिलांच्या सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावरच विचार विनिमय करून शिंदे-फडणवीस सरकारने सांस्कृतिक विभागाची मदत घेत ही नवी नियमावली तयार केली आहे. लवकरच यासंबंधीत अधिकृत माहिती सरकारच्या वतीने लवकरच देण्यात येणार आहे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com