Nitish Bharadwaj : या सीनमध्ये काही चुकीचं नाही ! ओपेनहायमर चित्रपटातल्या आक्षेपार्ह दृष्यावर बोलला हा अभिनेता

सध्या मनोरंजन विश्वात ओपेनहायमर चित्रपटातल्या या सीनची जोरदार चर्चा सुरू आहे
Nitish Bharadwaj
Nitish BharadwajDainik Gomantak
Published on
Updated on

मनोरंजन विश्वात सध्या ओपनहायमर सिनेमाची खुप चर्चा आहे. ओपनहायमर सिनेमात असलेल्या भगवद्गीता प्रसंगाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या प्रसंगावरुन भारतात अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.

अशातच नितीश भारद्वाज यांनी ओपनहायमर मधील भगवद्गीता प्रसंगाचं समर्थन केलंय. याशिवाय नितीश यांनी गीतेचा खरा अर्थ समजावुन सांगत प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचे आवाहन केलंय.

महाभारतातले श्रीकृष्ण म्हणतात..

नितिश भारद्वाज यांनी E टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की.. "जेव्हा ओपेनहाइमरने अणुबॉम्ब तयार केला आणि त्याचा वापर जपानच्या लोकांना मारण्यासाठी केला.

तिथे त्याने स्वतःलाच प्रश्न केला की आपण आपले कर्तव्य चोख बजावले की नाही! त्यांची एक प्रसिद्ध मुलाखत आहे, ज्यामध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. याचा अर्थ त्यांना त्यांच्या शोधाचा पश्चाताप होत आहे"

ओपेनहायमरला हे कळले असावे

नितिश भारद्वाज पुढे सांगतात, "त्याचा हा आविष्कार येत्या काळात मानवजातीचा नाश करेल हे कदाचित त्याला दिसले असेल. आणि यासाठी तो पश्चाताप करत होता.

आता या श्लोकाचा चित्रपटात केलेला वापर ओपेनहायमरच्या भावनिक अवस्थेतूनही समजून घ्यायला हवा. एक शास्त्रज्ञ त्याच्या निर्मितीबद्दल वर्षभर २४ तास विचार करत असत.तो जे काही करत आहे. त्याचे मन त्याच्या सृष्टीत पूर्णपणे मिसळून जाते. आणि शारीरिक कृती ही एक सामान्य यांत्रिक क्रिया आहे."

Nitish Bharadwaj
Manoj Kumar Birthday : जेव्हा भारताच्या पंतप्रधानांच्या सांगण्यावरुन या दिग्दर्शकाने बनवला होता हा चित्रपट...

नोलनचा संदेश समजून घ्या

नितीश भारद्वाज यांनी प्रेक्षकांना नोलनचा संदेश नीट समजून घेण्याचे आवाहन केले. 'मी प्रेक्षकांना ओपेनहायमरच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांच्या भावनिक पैलूचा विचार करण्यास सांगतो.

आपण निर्माण केलेले स्फोटक तंत्रज्ञान आपल्याच वंशजांच्या विनाशाला कारणीभुत होतोय, याची त्याला जाणीव आहे. आज कुरुक्षेत्रातही अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रियांनी धनुर्वेदाचा प्रचार केला नाही. संयुक्त राष्ट्रांनी UN ने आण्विक नि:शस्त्रीकरणाची गांभीर्याने अंमलबजावणी करावी. नोलनचा संदेश मोठा आणि स्पष्ट आहे. असा खुलासा करत नितीश यांनी प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचे आवाहन केलंय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com