'महाभारत 2.0' होणार बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट, वाचा सविस्तर एका क्लिकवर

Mahabharat 2.0: महाभारत 2.0 हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट असेल, जे एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचा विक्रम मोडेल.
Mahabharat 2.0
Mahabharat 2.0Dainik Gomantak
Published on
Updated on

एसएस राजामौली (S S Rajamauli) आरआरआर हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. मात्र आता या चित्रपटाचा विक्रम मोडला जाणार आहे. महाभारत 2.0 हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण, नाना पाटेकर, परेश रावल आणि अनिल कपूर सारखे मोठे स्टार दिसणार आहेत.

महाभारत 2.0 (Mahabharat 2.0) ची निर्मिती फिरोज नाडियादवाला आहेत. ज्याने 'हेरा फेरी' आणि 'बेलकम' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. स्क्रिप्टवर काम झाले आहे. हा चित्रपट प्रमुख भारतीय भाषांमध्ये डब केला जाणार आहे. फिरोज नाडियादवाला यांनी महाभारतावर काम सुरू केले आहे आणि तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अप्रतिम चित्रपट बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर 4-5 वर्षांपासून काम करण्यात आले असून आता प्री-प्रॉडक्शनला आणखी काही वर्षे लागतील.

Mahabharat 2.0
Chandigarh University MMS प्रकरणावर अभिनेता सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया

या चित्रपटाचे बजेट 700 कोटींहून अधिक असणार

महाभारताची संपूर्ण था चित्रपटात 3 तासांत सांगितली जाणार आहे. फिरोज नाडियाडवाला यांना या चित्रपटाबद्दल खात्री आहे की हा चित्रपट डीसी, मार्वल, द लॉर्ड ऑफ द रिंग्ज, गेम ऑफ थ्रोन्स, स्टार वॉर्स, हॅरी पॉटर आदींशी स्पर्धा करेल.या चित्रपटाचे बजेट 700 कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे. हाभारत २.० हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा बजेट चित्रपट असणार आहे. चित्रपटाचा बॅकग्राउंड स्कोअर लॉस एंजेलिसमध्ये रेकॉर्ड केला जाईल आणि लॉस एंजेलिसची एक प्रसिद्ध कंपनी चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करत आहे.

महाभारताची कथा हिट ठरली आहे

1965 च्या महाभारतात प्रदीप कुमार, पद्मिनी आणि दारा सिंह यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.या चित्रपटाचे दिग्दर्शन फिरोज खान यांचे चुलत भाऊ ए.ए.नाडियाडवाला होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 1983 मध्ये संपूर्ण रामायण गुजराती भाषेत तयार करण्यात आले होते. जे नंतर हिंदीत डब करण्यात आले. या चित्रपटात महाभारत युद्धाची संपूर्ण कथा दाखवण्यात आली आहे. जे कौरव आणि पांडव यांच्यात घडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com