Chandigarh University MMS प्रकरणावर अभिनेता सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया

सोनू सूद म्हणाला ही वेळ आमच्या बहिणींसोबत उभं राहण्याची आहे
Sonu Sood
Sonu Sood Dainik Gomantak

पंजाबमधील मोहाली येथील चंदिगड विद्यापीठात (Chandigarh University) काही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर आता अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोनू सूदने पीडित मुलींना पाठिंबा देत, लोकांना लीक झालेले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. सोनू सूदने घडलेली घटना "दुर्दैवी" असल्याचे म्हटले असून, लोकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले.

Sonu Sood
Sonali Phogat Death: सीबीआय अन् फॉरेन्सिक अधिकारी पुन्हा लिओन रिसॉर्टमध्ये दाखल

अभिनेता सोनू सूदने याबाबत ट्विट केले आहे. अभिनेत्याने ट्विट केले की, “चंदीगड विद्यापीठात जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या भगिनींच्या पाठीशी उभे राहून जबाबदार समाजाचे उदाहरण घालून देण्याची वेळ आली आहे. हा काळ पीडितांच्या नव्हे तर आपल्यासाठी परीक्षेचा आहे. जबाबदारीने वागा."

मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक शील सोनी यांनी माध्यमांना याबाबत माहिती देताना असे सांगितले की, प्राथमिक तपासादरम्यान असे आढळून आले आहे की अटक करण्यात आलेल्या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीने तिचा हिमाचल प्रदेशातील कोणाचा व्हिडिओ शेअर केला होता. या प्रकरणातील त्या व्यक्तीची भूमिकाही तपासली जात आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354-सी आणि आयटी कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यासोबतच मुख्य आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com