"आमच्याकडे अमर- अकबर- अँथोनी आहेत, चित्रपटाचा सिक्वल बनवायला हवा" लंडनचे महापौर असं का म्हणाले

लंडनचे महापौर सादिक खान यांनी अमर- अकबर- अँथोनीचा सिक्वल बनवण्याची मागणी केली आहे.
London Mayor Sadik Khan on Amar Akabar Anthony
London Mayor Sadik Khan on Amar Akabar AnthonyDainik Gomantak

London Mayor Sadik Khan on Amar Akabar Anthony : 70 च्या दशकात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर यांच्या एका चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. बरोबर हा चित्रपट होता मनमोहन देसाई दिग्दर्शित अमर अकबर अँथनी. या चित्रपटाच्या कथेने भारतीय प्रेक्षकांच्या धार्मिक सलोखा तर शिकवलाच होता पण कौटुंबिक मुल्यांचं महत्वही सांगितले होते.

भारतीय प्रेक्षकांवर तर या चित्रपटाने जादू केलीच होती पण आजही लंडनच्या महापौरांनाही या चित्रपटाचा सिक्वल यावा असे वाटते. चला पाहुया यासंदर्भातले सविस्तर वृत्त.

सादिक खान लंडनचे महापौर

लंडनचे महापौर सादिक खान यांना बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट 'अमर, अकबर, अँथनी' पुन्हा तयार करायचा आहे. सादिक खान हे लंडनचे महापौर असून ते तिसऱ्यांदा महापौरपदासाठी तयारी करत आहेत. 

सादिकचे आई-वडील 1970 मध्ये पाकिस्तानातून लंडनला आले. सादिक खानचे आई-वडील लंडनच्या दक्षिण भागात असलेल्या टुटिंगमध्ये राहत होते.

सादिक खान म्हणतात

माझ्याकडे बॉलिवूडचा प्रस्ताव असल्याचे सादिक खानने म्हटले आहे. कृपया अमर अकबर अँथनी यूकेमध्ये पुन्हा तयार करा कारण आमच्याकडे एक ख्रिश्चन राजा (लिंग चार्ल्स तिसरा), मुस्लिम महापौर (स्वतः) आणि हिंदू पंतप्रधान (ऋषी सुनक) आहेत. 

अमिताभ बच्चन यांची भूमीका साकारणार

यादरम्यान तो विनोदी स्वरात म्हणाला, मला अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारण्याची संधी मिळेल का? 1977 मध्ये रिलीज झालेल्या 'अमर, अकबर, अँथनी' मध्ये विनोद खन्ना (एक हिंदू पोलीस अधिकारी), ऋषी कपूर (एक मुस्लिम कव्वाली गायक) आणि अमिताभ बच्चन (एक ख्रिश्चन दारू विक्रेता) होते.

London Mayor Sadik Khan on Amar Akabar Anthony
अभिनेता अंगद बेदीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक, दिवंगत वडिलांना समर्पित केला सन्मान

लंडनमध्ये अनेक चित्रपटांचे शूटींग

सादिक खान म्हणाले की, लंडनमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. हे शहर लोकांना भेट देण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी देखील सर्वोत्तम आहे. विद्यार्थी म्हणून, पर्यटक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून आणि बॉलीवूड चित्रपटांच्या शूटिंगसाठी भारतीय लोक इथे येण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे.

सादिक खान यांचा प्रवास

सादिक खान यांनी सांगितले की, ते वयाच्या १५ व्या वर्षी लेबर पार्टीमध्ये सामील झाले होते. आपल्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून देताना महापौर म्हणाले की, त्यांचे वडील येथे बस चालवायचे, तर आई व्यवसायाने शिंपी होती. 2005 मध्ये जेव्हा तो टुटिंगसाठी खासदार झाला तेव्हा त्याने आपली कायदेशीर कारकीर्द सोडून दिली, जिथे ते अजूनही त्यांची वकील पत्नी सादिया आणि त्यांच्या दोन मुलींसोबत राहतात. लंडनमध्ये अनेक भारतीयांची घरेही आहेत.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com