Lisa Marie Presley: गायिका 'लीसा प्रेस्ली'ने घेतला जगाचा निरोप... जगातल्या संगीत रसिकांना धक्का

प्रसिद्ध अमेरीकन गायिका लीसा प्रेस्लीचं निधन झालं आहे. वर्षाच्या सुरूवातीला संगीत क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे
Lisa Marie Presley
Lisa Marie PresleyDainik Gomantak

2023 चं सुरूवातीचं वर्ष अमेरीका आणि जगभरातल्या संगीत क्षेत्रासाठी धक्कादायक ठरलं आहे. प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मेरी प्रेस्ली यांचं निधन झाल्याची दुखद बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या बातमीने जगभरातल्या संगीतप्रेमींना लीसाच्या चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे.

 वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेडिकल इमर्जन्सीमुळे लिसाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कृपया सांगा की लिसा मेरी प्रेस्ली दिवंगत अमेरिकन अभिनेता, गायक आणि संगीतकार एल्विस प्रेस्ली यांची मुलगी होती. 

लिसा ही एल्विस प्रेस्ली यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या आकस्मिक निधनाने प्रेस्ली कुटुंबावर दु:ख झाले आहे. चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे. 

या दु:खाच्या काळात सर्वांनी धीर दिल्याबद्दल आणि प्रार्थना केल्याबद्दल लिसाच्या कुटुंबाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या कठीण काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

लिसा प्रेस्ले काही काळ पॉप सिंगर मायकल जॅक्सनसोबत होती. दोघांनी लग्नही केलं होतं. मात्र, नंतर दोघांचा घटस्फोट झाला. 1994 साली दोघांनी लग्न केले होते. हे लग्न 1996 पर्यंत टिकले. एकदा प्रेस्लीने मायकेल जॅक्सनशी लग्न करताना त्याला मुले होण्याची भीती वाटत होती असं विधान केलं होतं. 

एका टॉक शो दरम्यान बोलताना लिसाने हे सांगितलं होतं की, 'माझ्यावर मुलं होण्यासाठी दबाव टाकला जात होता आणि मलाही मुल हवं होतं. पण मी भविष्याचा विचार केला आणि ठरवलं की मायकल सोबत कोठडीतलं आयुष्य नाही जगायचं.

Lisa Marie Presley
Oscars and 'The Kashmir Files' : थांबा थांबा...'द कश्मिर फाईल्स' ऑस्करसाठी शॉर्ट- लिस्टेड नाहीच...
Lisa Marie Presley
Lisa Marie PresleyDainik Gomantak

मिळालेल्या माहितीनुसार लीसा प्रेस्ली यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोनच दिवसांपूर्वी,ती तिच्या आईसोबत गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याचा आनंद घेताना दिसली होती. 

लिसाच्या आई प्रिसिला प्रेस्ली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लिसा प्रेस्ली पाच वर्षांची असताना तिचे वडील एल्विस प्रेस्ली आणि आई प्रिसिला यांचा घटस्फोट झाला. वयाच्या 9 व्या वर्षी तिने तिचे वडील गमावले. अमेरीकेच्या विस्कटलेल्या कुटूंब व्यवस्थेला लीसालाही बळी पडावं लागलं होतं.

गायिका आणि गीतकार म्हणून लिसाचा पहिला अल्बम 2003 मध्ये रिलीज झाला होता. संगीत क्षेत्रात लीसाने दिलेलं योगदान आणि तिचं वादळी आयुष्य नेहमीच प्रेक्षक लक्षात ठेवतील.

एक नामवंत गायीका आणि गीतकार म्हणुन ती स्मरणात राहीलच पण मायकल जॅक्सनसोबतचे तिचे प्रेमप्रकरण आणि नाट्यमयरीत्या वेगळं होणं हेसुद्धा लक्षात राहील. कलाकाराच्या पडद्यावरच्या दिसण्याबरोबरच त्याचं व्यक्तिगत आयुष्यही

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com