Zwigato Trailer : कपिल शर्माच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज...

कपिल शर्माच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Zwigato Trailer 
kapil sharma show
Zwigato Trailer kapil sharma showDainik Gomantak
Published on
Updated on

Zwigato Trailer: कपिल शर्मा पहिल्यांदाच एका गंभीर भूमीकेत दिसणार आहे कपिल नंदिता दासच्या झ्विगॅटोमध्ये फूड डिलिव्हरी एजंटची भूमिका करतो. या चित्रपटात शहाना गोस्वामी यांच्यासोबत सयानी गुप्ता आणि गुल पनाग यांच्याही विशेष भूमिका आहेत.

नंदिता दासच्या झ्विगाटोचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला. या चित्रपटात कपिल शर्मा आणि शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत आहेत. कपिल एका फूड डिलिव्हरी एजंटच्या भूमिकेत आहे, जो फॅक्टरीत फ्लोर इनचार्ज म्हणून नोकरी गमावल्यानंतर ही नवीन नोकरी स्वीकारतो. 

ट्रेलरची सुरुवात कपिलने Zwigato अॅपवर काम करण्यापासुन होते. तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना जेवण देण्याचं काम करत असतो, नंतर जादा कमाईसाठी लोकांसोबत सेल्फी क्लिक करतो आणि सर्वोत्तम रेटिंग मिळवण्याचा प्रयत्न करतो.

या काळात त्याची पत्नी देखील नवीन नोकरी सुरू करते, जी त्याला आवडत नाही. लवकरच, त्याचे रेटिंग कमी होतं आणि त्याचा संघर्ष सुरू करतो.  हताश होऊन तो मॅनेजमेंटशी संपर्क साधतो पण त्याला कसलीही मदत मिळत नाही.

Zwigato Trailer 
kapil sharma show
Salman Khan New Song : दोन मांजरांचा व्हिडीओ शेअर करत 'सलमान'ने नव्या गाण्याचं केलं प्रमोशन...

Zwigato 17 मार्च रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. नंदिता दास, ज्यांनी यापूर्वी फिराक आणि मंटो हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत त्यांचाच हा चित्रपट आहे ,ट्विट्टरवर त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं

"बहुप्रतीक्षित ऑर्डर शेवटी येत आहे! Zwigato 17 मार्च 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ही फूड डिलिव्हरी रायडर आणि त्याच्या कुटुंबाविषयीची हृदयस्पर्शी जीवन कथा आहे" आपल्या विनोदांनी सेलिब्रिटींना खळखळून हसवणारा कपिल आता या गंभीर भूमीकेत कसा दिसतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com