'लगान' चित्रपटातील अभिनेत्रीला ब्रेन स्ट्रोक; आर्थिक समस्यांशी देत आहे झुंज

आमिर खानसोबत (Aamir Khan) 'लगान' (Lagaan) चित्रपटात काम करणारी अभिनेत्री परवीना (Parveen Bano) सध्या आर्थिक समस्यांना तोंड देत आहे.
Lagaan actress struggling with financial problems, unemployed after brain stroke
Lagaan actress struggling with financial problems, unemployed after brain strokeDainik Gomantak
Published on
Updated on

आमिर खानसोबत (Aamir Khan) 'लगान' (Lagaan) चित्रपटात काम करणारी अभिनेत्री परवीना (Parveen Bano) सध्या आर्थिक समस्यांना तोंड देत आहे. जवळजवळ दोन दशकांपासून अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या परवीनाची अशी अवस्था झाली आहे की अन्न आणि औषधांसाठीही पैसे नाहीत. तिला गेल्या वर्षी ब्रेन स्ट्रोक झाला होता त्यानंतर तिची तब्येत ठीक नव्हती पण तिला कामावर परत यायचे होते. परवीना कोणाकडूनही आर्थिक मदत घेणे टाळू इच्छिते. तिने चित्रपटसृष्टीतील लोकांकडून मदत मागितली.

परवीनाने 'लगान' चित्रपटात 'केसरीया'ची भूमिका साकारली होती. मीडियाशी बोलताना परवीनाने तिची अग्निपरीक्षा सांगितली. ती म्हणाली, 'माझ्या कुटुंबाने मला नेहमीच मदत केली. अनेक मित्रही मदतीसाठी पुढे आले. माझी तब्येत ठीक होईपर्यंत मला थोडी आर्थिक मदत हवी आहे. मला कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करायचे आहे. मी सर्व प्रॉडक्शन हाऊसना विनंती करते की मला काम द्या.

Lagaan actress struggling with financial problems, unemployed after brain stroke
अरे बापरे! हृतिक रोशन गायब झाला होता तेव्हा...

अक्षय-सोनूने मदत केली होती

जेव्हा इंडस्ट्रीतील काही लोकांना परवीनाबद्दल कळले तेव्हा तेही मदतीसाठी पुढे आले. गेल्या वर्षी अक्षय कुमारने तिला मदत केली. त्याच वर्षी सोनू सूदनेही तिला मदत केली. या व्यतिरिक्त, सिने आणि टीव्ही कलाकार संघटना (CINTAA) ने देखील मदत केली आहे.

तिने आमिर खानबद्दल म्हणाले की, 'आमिर भाईला माझ्या आजाराबद्दल माहिती नाही. जर त्यांना माहिती असते तर त्यांनी देखील मला नक्कीच मदत केली असती. आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याने श्री वल्लभ व्यास यांच्यासह त्याच्या 'लगान' च्या सह-कलाकारांना मदत केली आहे. मला त्याच्याकडून एवढेच हवे आहे की मला त्याच्या कार्यालयात काम द्यावे. परवीनाचे मुख्य चित्रपट 'कोहराम', 'लाल सलाम' आणि 'पिंजर' हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com