Kumar Sanu's Daughter: जेव्हा 15 व्या वर्षी कुमार सानु यांच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता...

गायक कुमार सानु यांच्या मुलीने तिने 15 व्या वर्षी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाविषयी सांगितले.
Kumar Sanu Daughter
Kumar Sanu DaughterDainik Gomantak
Published on
Updated on

Kumar Sanu's Daughter: आशिकीच्या गाण्यांनी बॉलिवूडला वेड लावणारे गायक कुमार सानु मोठा संघर्ष करुन पुढे आले आहेत. पण आयुष्यातली गुंतांगुंत त्यांच्यापुरतीच मर्यादित नव्हती तर तो संघर्ष त्यांच्या मुलीच्या आयुष्यातही आला होता.

गायक कुमार सानू हे गायनाच्या विश्वातील एक मोठे आणि प्रसिद्ध नाव आहे. त्यांची गाणी जितकी गोड आहेत तितकेच त्यांचे आयुष्य उलथापालथींनी भरलेले आहे.

लग्नापासून ते मुलांपर्यंत असे अनेक खुलासे झाले होते, ज्यानंतर कुमार सानूच्या आयुष्यात बरेच काही घडल्याचे समोर आले.

 नुकतेच कुमार सानूची मुलगी शॅननने अनेक मोठे खुलासे करून लोकांना हैराण केले आहे. शॅननने मोठे होत असताना ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्याबद्दल सांगितले. 

यासोबतच तिने तिचं डिप्रेशनमध्ये जाणे आणि स्वत:ला होणारे नुकसान अशा अनेक गोष्टी सांगितल्या. तिने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे शॅननने सांगितले.

तिच्या आयुष्यातील वाईट टप्प्याबद्दल बोलताना, कुमार सानूची मुलगी शॅननने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तिने पहिल्यांदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला तेव्हा ती 14 किंवा 15 वर्षांची होती.

लोक तिच्या पोस्ट आणि फोटोंवर करत असलेल्या कोणत्याही नकारात्मक कमेंटसमध्ये ती खूप लहान असल्याचं सांगितलं जायचं.

शॅनन म्हणाली की ती खूप भोळी आणि असुरक्षित होती, म्हणूनच तिने हे सर्व खूप गांभीर्याने घेतले. 

शॅननने पुढे सांगितले की, ट्रोलिंगने तिच्या मनावर इतका परिणाम केला की ती नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आयुष्यातील हा अत्यंत कठीण आणि काळा काळ होता, असेही ती म्हणाली.

Kumar Sanu Daughter
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection: सलमानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

शॅनन म्हणाली की तिचे कुटुंब आणि मित्र तिला त्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी तिथे होते आणि हा खरोखरच तिच्या आयुष्यातला एक मोठा धडा होता.

तिला आता मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या लोकांना मदत करायची आहे. तिला त्या लोकांना सांगायचं आहे कि, अंधाराच्या शेवटी प्रकाश आहे कारण ती देखील त्यातून गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com