Akshay Kumar: मोदींचं गाणं ऐकून बॉलीवूडच्या खिलाडीला आलं टेन्शन; म्हणाला 'आता आम्ही कुठे जायचं...?'

Akshay Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे 190 सेकंदांचे गाणे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Akshay Kumar
Akshay KumarDainik Gomantak

Akshay Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या भाषणामुळे, कोणत्या योजनेमुळे, कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत नाही तर त्यांच्या गरबो गाण्यामुळे मोठ्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या गाण्याला युट्युबवर चांगलीच पसंती मिळत असून विविध प्रकारच्या कंमेटदेखील यावर पाहायला मिळत आहेत.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनेदेखील ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले की, 'हे खरोखरच अद्भुत आहे मोदीजी. आता तुम्हीही आमच्या क्षेत्रात आहात, आम्ही कुठे जायचे. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. असे म्हणत त्यांने मोदींना आपल्या अनोख्या अंदाजात गाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra Modi ) यांनी लिहिलेल्या गरबा गाण्याचा म्युझिक व्हिडिओ नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला. हे अनेक वर्षांपूर्वी पीएम मोदींनी लिहिले होते आणि आता ते ध्वनी भानुशालीने गायले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे 190 सेकंदांचे गाणे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोशल मिडिया( Social Media ) प्लॅटफॉर्म एक्स वर त्यांना या गाणे शेअर करताना ध्वनी भानुशालीने आपला आवाज दिल्याबद्दल आभार मानले आहेत. याबरोबरच त्यांनी म्हटले आहे की, मी अनेक वर्षापूर्वी हे गाणे लिहले होते.

Akshay Kumar
Jawan Box Office: ...अन् शाहरुखने पहिला नंबर पटकावला; 39 व्या दिवशीदेखील 'जवान'ने कमावले कोटी

माझ्या अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात मी काही लिहले नाही मात्र मी एक गाणे लिहले आहे ते मी नवरात्रीदरम्यान तुमच्याबरोबर शेअर करेन. 'गरबो' नावाचे हे गाणे ध्वनी भानुशालीने गायले असून तनिष्क बागचीने संगीत दिले आहे. अभिनेता-निर्माता जॅकी भगनानीच्या जेजस्ट म्युझिकच्या बॅनरखाली हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com