अभिनेता मनोज वाजपेयी हिंदी चित्रपटसृष्टीतला एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. मनोजने आजवर अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चमक दाखवून प्रेक्षकांना थक्क करून सोडले आहे.
सत्या, गॅंग्ज ऑफ वासेपूर, अलिगढ, जुबैदा यांसारख्या चित्रपटातून मनोज वाजपेयींमधला एक कसलेला अभिनेता आपल्या समोर येतो. अभिनेता मनोज वाजपेयी द फॅमिली मॅन या वेब सिरीजमुळे बरेच चर्चेत होते आता पुन्हा एका कारणामुळे मनोज चर्चेत आला आहे पण यावेळी त्याचं कौतुक नाही तर त्याला नशेडी म्हटल्यामुळे.
प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात इंदूर जिल्हा न्यायालयाने स्वघोषित चित्रपट क्रिटीक्स कमाल रशीद खान उर्फ केआरके विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर केआरकेने मनोज वाजपेयीला ‘चर्सी आणि गंजेडी’ संबोधल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाजपेयी यांचे वकील परेश जोशी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
जोशी म्हणाले की, त्यांच्या क्लायंटच्या अर्जावरील दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी (जेएमएफसी) यांनी गुरुवारी KRK विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आणि कोर्टात हजर राहण्यासाठी 10 मेची तारीख निश्चित केली.
या अर्जात वाजपेयींच्या वतीने सांगण्यात आले होते की, केआरकेला इंदूरच्या जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या मानहानीच्या खटल्याची पूर्ण माहिती आहे, परंतु खटल्याच्या सुनावणीला उशीर करण्यासाठी तो मुद्दाम कोर्टात हजर होत नाही.
दुसरीकडे, KRK च्या वतीने, JMFC ला जिल्हा न्यायालयात त्यांच्याविरुद्धच्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली कारण त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांना स्थगिती आदेशातून दिलासा मिळण्याची आशा आहे. जेएमएफसीला केआरकेनेही कॅन्सरने पीडित असल्याची माहिती दिली होती.
उल्लेखनीय म्हणजे, 13 डिसेंबर 2022 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने इंदूरच्या जिल्हा न्यायालयात KRK विरुद्ध दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी मनोज वाजपेयीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
"पद्मश्री" पुरस्कार विजेते बाजपेयीने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात आरोप केला आहे की केआरकेने त्याची प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या ट्विटर हँडलवरून 26 जुलै 2021 रोजी दोन ट्विटमध्ये त्यांना "चरसी आणि गंजेडी" म्हटले.
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील युक्तिवादादरम्यान, केआरकेच्या वकिलांनी हा आरोप फेटाळताना सांगितले की, 22 ऑक्टोबर 2020 रोजी "केआरके बॉक्स ऑफिस" या ट्विटर हँडलवरून मानहानी केली आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.