बल्लू जेलमधून फरार होण्यासाठी सज्ज? सुभाष घईंच्या लग्नाच्या वाढदिवसाला जमली 'खलनायक'ची टीम

दिग्दर्शक सुभाष घईंचा खलनायक हा चित्रपट 90 च्या दशकातला एक माईलस्टोन चित्रपट ठरला होता.
Subhash Ghai's Khalnayak 2 Soon
Subhash Ghai's Khalnayak 2 SoonDainik Gomantak
Published on
Updated on

Subhash Ghai's Khalnayak 2 Soon : गेल्या काही दिवसांपासून 90 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर हीट ठरलेल्या खलनायक या चित्रपटाचा सिक्वल बनणार असल्याची चर्चा सुरु आहे. संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि माधुरी दिक्षीतसारख्या स्टार्सनी या चित्रपटात काम केलं.

चोली के पीछे क्या है या गाण्याची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये दिसून येते. या चित्रपटाची टीम नुकतीच सुभाष घईंच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी जमली होती.

माधुरीने शेअर केले फोटो

माधुरीने सुभाष घईंच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या आपल्या सहकलाकारांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये संजय दत्त, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, सुभाष घई आणि त्यांची पत्नी मुक्ता घई एकत्र दिसत आहेत. 

यावेळी माधुरीचे पती डॉ.श्रीराम नेनेही उपस्थित होते. माधुरीने शेअर केलेल्या पोस्टच्या पहिल्या फोटोमध्ये माधुरी पती श्रीराम नेने आणि सुभाष घई यांच्यासोबत बाल्कनीत पोज देताना दिसली.  

माधुरीचा किलर लूक

माधुरी दीक्षित ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. चित्रात सुभाष घई यांच्या घरातून समुद्राच्या विहंगम दृश्याची झलक पाहायला मिळते. अभिनेत्रीने फोटो शेअर करत लिहिले, 'ही कंपनी संध्याकाळ बनवते. सुभाष घई आणि मुक्ता घई यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 

फोटो पाहून आठवणी ताज्या

ही छायाचित्रे पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 'खलनायक'ची स्टारकास्ट एकत्र बघून चाहते आता 'खलनायक'च्या सिक्वेलची मागणी करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, 'मला वाटते कलानायक 2 येत आहे.'

 त्याचवेळी सुभाष घई यांनी संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबतच्या संभाषणाचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, '1990 च्या दशकाप्रमाणे मनापासून बोलणे आणि हसणे खूप छान आहे. 

45 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही आमच्या घरी नायक आणि खलनायक संजय ड्यूटी आणि जॅकी श्रॉफ सारख्या आमच्या चांगल्या मित्रांसोबत खूप छान वेळ घालवला.  

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com