Kay Kay Menon : के. के. मेननचा फर्जीतला रोमांचक कॅरेक्टर व्हिडिओ रिलीज..भन्नाट कॅरेक्टरची एक झलक

के.के मेननच्या आगामी 'फर्जी'चा एक कॅरेक्टर व्हिडीओ समोर आला आहे.
Kay Kay Menon
Kay Kay Menon Dainik Gomantak

Kay Kay Menon New Video from Farzi: ओटीटी प्लॅटफॉर्मचा कंटेट दिवसेंदिवस दर्जेदार आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यात गेल्या काही दिवसांत कमालीचा यशस्वी झाला आहे. क्राईम थ्रीलर आणि अॅक्शन अशा सगळ्याच प्रकारांत ओटीटीचा

अमेझॉन प्राइम व्हिडिओची आगामी क्राईम थ्रिलर सिरीज 'फर्जी'बद्दल चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस उत्सुकता वाढत असतानाच, आता प्राइम व्हिडिओने मन्सूर दलालची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या के. के. मेननचा(Kay Kay Menon) रोमांचक कॅरेक्टर व्हिडिओ रिलीज केला आहे.

या सिरीजमध्ये, के. के. मेनन (Kay Kay Menon) एका नकली किंगपिनची भूमिका साकारत असून, याला पकडण्यासाठी आणि बनावट नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी मायकल उर्फ ​​विजय सेतुपती त्याच्या शोधात निघतो. ही दोन नावं वाचल्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की ही सिरीज किती उत्कंठा वाढवणारी असेल?

अत्यंत चपळ असा किंगपिन, मन्सूर हा भारतीय बनावट नेटवर्कमागतचा चेहरा आहे.के.के मेनन आणि विजय सेतुपती यांच्या अभिनयाचे प्रेक्षक चाहते आहेतच. हे दोन तगडे कलाकार समोर आल्यावर काहीतरी जबरदस्त बघायला मिळेल हे नक्की.

Kay Kay Menon
Rakhi Sawant Arrested by Police : राखी सावंतची साडेसाती थांबेना... पोलिसांनी केली अटक.

'फर्जी'ही आठ भागांची क्राईम थ्रिलर सिरीज आहे ज्यामध्ये राज आणि डीके यांचा सिग्नेचर ह्युमर पाहायला मिळणार आहे. यात एक हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्ट दिसणार असुन त्याच्या नजरेतून एलीट क्लासची बाजू घेणाऱ्या सिस्टमला फेल करण्याचा करत असलेला प्रयत्न यातून दाखवला आहे.

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 'फर्जी'ही सिरीज 10 फेब्रुवारीपासून प्राइम व्हिडिओवर भारत आणि 240 हून अधिक देशांत एकाचवेळी प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com